हिंदु ग्राहकांना ‘हलाल’ अन्नपदार्थांची सक्ती नको, तर  ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत !

हिंदु जनजागृती समितीची उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पणजी, १७ ऑक्टोबर – हिंदु ग्राहकांना सक्तीने ‘हलाल’ अन्नपदार्थ दिले जाऊ नयेत, तसेच हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आली. दक्षिण गोव्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांना भेटून हलालविषयी सविस्तर माहिती देऊन हे निवेदन देण्यात आले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

उत्तर गोव्यात समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘भारत माता की जय’ संघटनेचे प्रा. मुकुंद कवठणकर, श्री. लक्ष्मीकांत केरकर आणि श्री. सुरेश डिचोलकर; गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, ‘शिव प्रतिष्ठान’चे श्री. मंदार गावडे, ‘वीर सावरकर’ संघटनेचे श्री. अरूण नाईक, राष्ट्रीय हिंदू वाहिनीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. सुभाष कुशवाह, केसरिया हिंदु वाहिनीचे श्री. सुभाष कवठणकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुशांत दळवी आदींचा समावेश होता.

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’’ (FSSAI), तसेच प्रत्येक राज्यात स्वतंत्र असा ‘अन्न आणि औषध प्रशासन’ विभाग (FDA) अस्तिवात असतांना सध्या भारतीय मुसलमानांकडून केवळ मांसच नव्हे, तर धान्य, फळे, सौयर्दप्रसाधने, औषधे, आदी उत्पादनेही इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ नामांकित असावी, अशी मागणी करण्यात येत आहे. देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ? केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे. हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव करणार्‍या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर भारतात बंदी आणावी. ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्या सर्व आस्थापनांची अशी अनुमती त्वरित रहित करण्यात यावी. ज्या संस्था ‘हलाल प्रमाणपत्र’ देतात, त्या सर्व संस्थांची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ? याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ? याची सखोल चौकशी करण्यात यावी.

 * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘के.एफ्.सी.’ आस्थापनाच्या मडगाव येथील उपाहारगृहात निवेदन सुपुर्द

‘के.एफ्.सी.’ मडगाव येथील उपाहारगृहात निवेदन देतांना समितीचे शिष्टमंडळ

मडगाव, १७ ऑक्टोबर – ‘के.एफ्.सी.’ आस्थापनामध्ये हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्थापन झालेल्या हलालविरोधी कृती समितीने केले आहे. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाने यासंबंधीचे निवेदन ‘के.एफ्.सी.’ मडगाव येथील उपाहारगृहात सुपुर्द केले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘केसरिया हिंदु वाहिनी’चे राष्ट्रीय सचिव श्री. राजीव झा, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रवीण यादव, हरि प्रभु, दत्तात्रय आमोणकर आदींचा सहभाग होता.

समितीने निवेदनात म्हटले आहे की, देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ? हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. हिंदूंना सक्तीने ‘हलाल’ पदार्थ खाऊ घालून तुम्ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणत आहात. हे घटनाविरोधी आहे. आपल्या आस्थापनात हिंदु ग्राहकांसाठी ‘हलाल’ नसलेले पदार्थ त्वरित उपलब्ध करून द्यावेत, ‘हलाल’ आणि ‘नॉन हलाल’ असे पदार्थ उपलब्ध असल्याचे सुस्पष्ट शब्दांत सर्वांना दिसेल, अशा प्रकारे ‘सूचना फलक’  आस्थापनात लावावा आणि ‘मेनू कार्ड’मध्ये ‘हलाल’ आणि ‘नॉन हलाल’, अशी वर्गवारी उपलब्ध करून द्यावी.

‘के.एफ्.सी.’ आस्थापनाच्या मडगाव येथील उपाहारगृहाच्या व्यवस्थापक प्रिया पेडणेकर यांना निवेदन दिल्यावर त्यांनी त्यांची सर्व उत्पादने १०० टक्के हलाल आहेत आणि हिंदू हलाल खातात, असे सांगितले.

____________________________________________

______________________________