दिवसा पथदीप बंद करण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘दिवसा पथदीप बंद करून अपव्यव थांबवण्याची मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या माध्यमातून गोव्याच्या वीजमंत्र्यांकडे ऑक्टोबर २०२१ च्या प्रारंभी करण्यात आली होती. दिवस उजाडल्यानंतर पथदीप बंद करण्याची सोय उपलब्ध करणे, कामचुकार सरकारी कर्मचार्‍यावर कारवाई करणे आणि शहर अन् ग्रामीण भागांतील वीज केंद्रांच्या वतीने यावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण पथक नेमावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली होती.’