कुतूबमिनार नव्हे, तर मेरुस्तंभ, म्हणजेच वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा !

‘नुकतीच देहलीतील साकेत न्यायालयात कुतूबमिनारवर स्वामित्वाच्या अधिकाराविषयी एक याचिका प्रविष्ट झाली. त्याविषयी न्यायालयात १७ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी आहे. खरेतर अनेकदा मुसलमान कुतूबमिनारवर त्यांचा हक्क सांगतात; पण प्रत्यक्षात कुतूबमिनार कुणी बांधला ? तो नेमका काय आहे ? याविषयीच्या माहितीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

आचार्य वराहमिहीर अनेक वेधयंत्र आणि वेधशाळा यांचे निर्माते होते. येथे एक गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की, देहलीच्या मिहरौलीमध्ये असलेला मेरुस्तंभ म्हणजे वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा होती. यासाठी आपल्याला त्याच्या निर्मितीची आवश्यकता, निर्मितीचा कालावधी, त्याची रचना, त्यातील तुटलेला भाग, त्याचा इतिहास, त्याच्या स्थापत्यकलेचे सर्व पैलू आणि पुरावे सूक्ष्मपणे अभ्यासण्याची आवश्यकता आहे.

कुतुब मीनार

१. क्रूरकर्मा कुतुबुद्दीनने हिंदूंचा वंशविच्छेद करणे आणि मंदिरांचा विध्वंस करून तेथे मशिदी बांधणे

‘तबकात-ए-नासिरी’ या इतिहासाच्या ग्रंथाच्या मते कुतुबुद्दीनची लहान करंगळी तोडण्यात आली होती. त्यामुळे त्याला ‘ऐबक’ (हाताने अपंग) म्हटले जात होते. इतिहासाचा आणखी एक ग्रंथ ‘ताजुल-मा-आसीर’ सांगतो की, कुतुबुद्दीन ऐबक काफिरांचा (हिंदूंचा) विध्वंसक आहे. त्याने धारदार तलवारीने मूर्तीपूजकांचे सर्व संसार नरकाच्या आगीत झोकून दिले. प्रतिमा आणि मूर्ती यांच्या ठिकाणी मशीद अन् मदरसे यांचा पाया रचला. त्याच्या या कृत्यांमुळे लोकांना नौशेरा, रुस्तम आणि हातीमताई यांच्या लढाईचाही विसर पडला होता.

वर्ष १२०६ ते १२१० पर्यंत हिंदुस्थानात मुसलमानांच्या अधिकृत भूभागाचे नाव सुलतान होते. या ४ वर्षांमध्ये कुतुबुद्दीनचा अधिकांश वेळ ठिकठिकाणी पळापळ करून विद्रोह दाबण्यात गेला. या काळात तो २ वेळा गझनी येथे गेला, तसेच लहान मोठ्या युद्धांमध्ये व्यस्त राहिला आणि नोव्हेंबर १२१० च्या प्रारंभीच्या दिवसांमध्ये लाहोरच्या चौगानमध्ये घोड्यावरून पडून मरण पावला.

२. एकाही इतिहासकाराने कुतूबमिनार बनवल्याचे श्रेय कुतुबुद्दीनला न देणे

जगातील एकाही इतिहासकाराने त्याला तथाकथित कुतूबमिनार बनवण्याचे श्रेय दिले नाही. प्रसिद्ध इतिहासकार आणि जम्मू-काश्मीरचे माजी न्यायाधीश आर्.बी. कंवर सेन यांनी यावर एक संपूर्ण पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. त्यात ‘कुतुबुद्दीन ऐबकचा या मिनारशी कोणताही संबंध नव्हता’, (Qutubuddin Aibak, the first Muslim rular of Delhi, was not the author or founder of Qutub Minar) असे स्पष्ट नमूद केले आहे. नावाच्या साधर्म्यामुळे जरी मानले की, त्याने हे मिनार बनवले, तरी प्रश्न येतो, ‘त्याने याची निर्मिती कधी चालू केली ? त्यासाठी एकूण किती लोकांनी काम केले ? कारागीर कोण कोण होते ? यावर एकूण किती व्यय आला ? हे संपूर्ण सिद्ध कधी झाले ? आणि कुतुबुद्दीन ऐबकच्या तथ्यावलीच्या दिनांकांमध्ये कुठेही या मिनारच्या चार भिंतींच्या आत ख्रिस्तपूर्व २८० वर्षे पुरातन ‘गरुडस्तंभ’ कुठून आला ?’

३. मुसलमान इतिहासकारांनी ‘कुतूबमिनार’चे श्रेय कुतुबुद्दीनला देणे

‘कुतूब’ हा एक उर्दू शब्द असून त्याचा अर्थ ‘ध्रुव’ असा होतो आणि कुतूबमिनारचा साधा सरळ अर्थ ‘ध्रुवस्तंभ किंवा ध्रुवतारा पहाण्याची मिनार’, असा होतो. अरबी भाषेतही कुतूबमिनारचा अर्थ ‘नक्षत्र निरीक्षणाचा स्तंभ’, असा आहे, म्हणजे या हिंदु स्तंभाचा उपयोग नक्षत्रांचे निरीक्षण करण्यासाठी होत होता. त्यामुळे बोलीभाषेत त्याला ‘कुतूबमिनार’ संबोधले जात होते. आजही दिशादर्शक चुंबकीय यंत्र जे पाण्याचे जहाज आणि पाणबुडी यांमध्ये लागलेले असते, त्याला बोलीभाषेत ‘कुतूबनामा’ किंवा ‘कुतूबघडी’ म्हटले जाते. मुसलमान इतिहासकारांनी या साध्या शब्दाला ‘कुतुबुद्दीन’शी जोडले आणि अर्ध झोपेत ‘कुतूबमिनार’चे श्रेय कुतुबुद्दीनला दिले.

ज्योतिषी डॉ. जितेंद्र व्यास

४. देहली येथील तथाकथित कुतूबमिनारच्या उत्खननात अनेक देवतांच्या मूर्ती निघणे; पण त्यांना लपूनछपून गायब करण्यात येणे

मेरुस्तंभाचे वास्तविक स्वरूप आतासारखे नव्हते, तर ते अतिशय विशालकाय होते. २७ नक्षत्रे समजण्यासाठी याच्या चारही बाजूंनी २७ नक्षत्र भवन होते की, जे उभारण्यासाठी आजच्या हिशोबाने कोट्यवधी रुपये व्यय करण्यात आले होते. हा स्तंभ ‘देहलीचा लाट’, पृथ्वीराजचा ‘विजयस्तंभ’, ‘सूर्यस्तंभ’, ‘वेधस्तंभ’, ‘विक्रमस्तंभ’ आदी नावांनी सुपरिचित होता. वर्ष १९७६ मध्ये देहली येथील तथाकथित कुतूबमिनारचे उत्खनन करण्यात आले. ज्यात अनेक देवतांच्या मूर्ती निघाल्या. काही पायथ्यातून, तर काही भिंतीतून निघाल्या. त्या काळी पुरातत्व विभागाचे मंत्री काँग्रेसचे सदस्य आणि मुसलमानही होते. याखेरीज कुतूबमिनारचे अभिलेख पाहिल्यानंतर अधिक एक पुरावा आपल्याला मिळतो की, अनेक हिंदु राजे आणि मुसलमान सुलतान यांनी वेळोवेळी याची दुरुस्ती केली; परंतु कुठेही या इमारतीचे नाव ‘कुतूबमिनार’ म्हणून नोंदवलेले नाही, तसेच याचे आद्यनिर्माते म्हणून कुतुबुद्दीनच्या नावाचीही कुठेही नोंद नाही. या दोन्ही भूमिकांनी त्याला कुतूबमिनारमध्ये हिंदु पुरावा मिळणे योग्य वाटले नाही. तथापि मूर्ती रात्रीच्या उत्खननामध्ये ज्या हिंदु मूर्ती मिळाल्या, त्या वेळी दूर नेऊन गायब करण्यात आल्या.

५. उत्खननातील मूर्तींच्या हेराफेरीविषयी प्रसिद्ध इतिहासकार स्व. पु.ना. ओक यांनी तत्कालीन पुरातत्व विभागप्रमुख आणि राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करणे

देवतांच्या मूर्तींच्या हेराफेरीविषयी प्रसिद्ध इतिहासकार स्व. पु.ना. ओक यांनी मार्च १९८७ आणि वर्ष १९८८ मध्ये अनेक पत्रे लिहून भारताचे तत्कालीन पुरातत्व विभाग प्रमुख जागतपती जोशी आणि तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्याकडे तक्रार केली; परंतु ते दोघेही चूप राहिले. वरील सर्व पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, तथाकथित गुलामवंशीय सुलतान कुतुबुद्दीनचा कुतूबमिनारशी कोणताही संबंध नव्हता आणि नाही. कुतुबुद्दीनसारखा विध्वंसक कधीही याचा निर्माता होऊ शकत नाही.

६. कुतूबमिनारच्या परिसरात जगातील सर्वाधिक शुद्ध ‘पिटवा’ लोखंडाच्या माध्यमातून ‘गरुडस्तंभ’ उभारण्यात येणे 

याच्या निर्मितीचा कालावधी लक्षात घेतल्यास ही गोष्ट निश्चित आहे की, प्रस्तुत मेरुस्तंभ अतिशय विचारपूर्वक, योजनाबद्ध, सावकाश आणि सबळ एखाद्या हिंदु सम्राटाच्या देखरेखीखाली बनवण्यात आलेले हिंदु स्थापत्यकलेचे अजोड उदाहरण आहे. त्याला तत्कालीन सम्राटाने मुक्तहस्ते धन आणि वेळ देऊन मोठ्या प्रेमाने बनवले आहे. तथाकथित कुतूबमिनारच्या परिसरात उभारलेल्या या गरुडस्तंभाचे लोखंड इतके शुद्ध आहे की, ज्याला जगातील सर्वाधिक शुद्ध ‘पिटवा’ लोखंड म्हटले गेले आहे. या स्तंभात लोखंड ९९.७२० टक्के, कार्बन ०.०८० टक्के आणि फॉस्फरस ०.११९ टक्के आहे. या लोहस्तंभावर कधीही ओरखडा येत नाही आणि धूळ जमत नाही. आज सहस्रो वर्षे होऊनही त्यावर वादळ, पाऊस आणि उष्णता यांचा कोणताही परिणाम झालेला नाही. संपूर्ण विश्वात ‘भारतीय धातूविज्ञाना’चे हे एक अनुपम उदाहरण आहे. ज्याला जगात कुठेही तोड नाही. वराहमिहीर यांच्या ‘बृहत् संहिते’च्या अध्याय ५७ मधील श्लोक १ ते ८ यांतील ‘वज्रलेपाध्याय’मध्ये धातूंच्या संघात आणि वज्रलेप बनवण्याची विधी सांगितला आहे की, जो १ कोटी वर्षांपर्यंत खराब होत नाही.

७. मेरुस्तंभ हिंदु स्थापत्यकलेचे एक अनुपम उदाहरण

सुप्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्ववेत्ता डॉ. डी.एस्. त्रिवेदी यांनी ‘कुतूबमिनार किंवा विष्णुध्वज’ नावाचा एक शोधग्रंथ लिहिला. यासाठी त्यात खोडून न काढता येणारे पुरावे दिले आहेत. त्यानुसार कुतूबमिनार हिंदु स्थापत्यकलेचे एक अनुपम उदाहरण आहे, ज्याला ख्रिस्तपूर्व २८० मध्ये हिंदु सम्राट समुद्रगुप्त याने उभारले आहे. या पुस्तकाच्या भूमिकेने इतिहासमर्मज्ञ सर रामास्वामी अय्यर यांनी स्पष्ट केले की, समुद्रगुप्त याने त्याच्या शासनकाळात एकूण ३ वेधशाळा उभारल्या. त्यात पहिली देहली येथील मिहारावली (मिहरौली), दुसरी गया (बिहार) येथे आणि तिसरी फिरोज खा (तुर्कस्तान) येथे बनवली. या स्थानावर (मिहारावली) ख्रिस्ताब्द ४ थ्या शतकामध्ये निर्मित लोहस्तंभ (विष्णुस्तंभ) त्यांचे पुत्र चंद्रगुप्त मौर्य यांच्या कीर्तीमध्ये गाडण्यात आला.

८. कुतूबमिनारच्या उत्खननामध्ये संस्कृतमधील शिलालेख हिंदु धर्माशी संबंधित चिन्हे आढळून येणे

कुतूबमिनारच्या उत्खननामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख आणि लाल दगडांवर कामधेनू, तसेच वराह यांचे राजचिन्ह आढळून आले. गाय आणि वराह या दोन्ही प्राण्यांविषयी इस्लाममध्ये प्रचंड शत्रूता आणि घृणा आहे. भारत किंवा भारताच्या बाहेर कोणत्याही मशिदीमध्ये गाय, स्वस्तिक, घंटा, विष्णु, गरुड, झाडे, पानाफुलांचे तोरण आणि अलंकारिता यांविषयीचे चिन्हे सापडणार नाहीत; कारण इस्लाम धर्माची जेथे निर्मिती झाली, तेथे ना झाडे होती, ना सुंदर पशुपक्षी, नाही पाने, तसेच यांना चित्रित करण्याची तेथे स्थापत्य परंपराही नव्हती. कालांतराने ती परंपरा रूढी बनली, तसेच कोणत्याही जिवंत प्राण्याची आकृती न बनवण्याचा नियम इस्लाम स्थापत्य कलेचा अनिवार्य अंग बनले. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने देहलीवर एक पुस्तक प्रकाशित केले, ज्याच्या पृष्ठ क्रमांक ५५ वर म्हटले की, ‘जनश्रुती’नुसार कुतूबमिनार देहलीचा शेवटचा शासक सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी बनवला, जेथे जाऊन त्याची मुलगी यमुना नदीचे उगमस्थान संपूर्ण रूपात पहात होती आणि नदीचे नित्य पूजन करत होती. तथापि या मिनारच्या बाहेरचे स्वरूप इस्लामिक असल्याचे दिसते आणि यात हिंदु स्थापत्य शैलीही पुष्कळ प्रमाणात दिसून येते. यासंदर्भात यात आढळून येणारे देवनागरीचे शिलालेख आणि मंदिर यांचे मूर्तीमंत पाषाण स्वत: या वस्तूस्थितीचे पुरावे आहेत.

(१.१०.२०१२)

– जोतिष डॉ. जितेंद्र व्यास, जोधपूर, राजस्थान.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/620750.html

संपादकीय भूमिका

परकीय आक्रमकांच्या पूर्वीपासून असलेल्या हिंदूंच्या वास्तू आणि भूमी यांच्यावर धर्मांधांनी दावा सांगण्यामागील षड्यंत्र जाणा !