सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची हानी !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली – जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची मोठी हानी झाली आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यांसह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. टॉमेटोची पिके आडवी झाल्याने शेतकर्‍यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. ‘प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि हानीभरपाई द्यावी’, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.