जे सरकार भारतातील हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, ते बांगलादेशी हिंदूंचे रक्षण करील !

बांगलादेशी संघटनेची भारत सरकारवर उपरोधिक टीका !

ढाका (बांगलादेश) – ‘भारत सरकारने बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला. जे स्वत:च्या देशातील हिंदूंना संरक्षण देऊ शकत नाहीत, ते बांगलादेशी हिंदूंना सुरक्षा पुरवणार आहेत’, अशी उपरोधिक टीका ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या बांगलादेशातील संघटनेने ट्वीट करून केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये ‘#MominporeViolence’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. यातून त्यांनी बंगालमधील मोमीनपूर येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या (मंहमद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या) वेळी धर्मांध मुसलमानांनी केलेला प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड यांवरच प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे लक्षात येत आहे. या दंगलीमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड केली.