हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त आसाममध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
गौहत्ती (आसाम) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. राज्यातील मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा, तसेच विविध ठिकाणी व्याख्याने, हिंदूसंघटन बैठका, वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून धर्मजागृती करण्यात आली.
१. विविध मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञांचे आयोजन
येथील प्रसिद्ध शक्तीपीठ मां कामाख्या मंदिर, मां महामाया मंदिर, बोग्रिबरी, श्री श्री महाप्रभू शुक्रेश्वर देवालय, श्री बाघेश्वरी मंदिर, बंगाईगांव, श्री काली मंदिर, होजाई या मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यात सर्वश्री कामांख्या मंदिराचे अध्यक्ष कबिन्द्र प्रसाद सर्मा, पुजारी मनोज सर्मा, महामाया मंदिराचे विश्वस्त बिमन चक्रबोर्ती, श्री श्री शुक्रेश्वर देवालयाचे विश्वस्त आणि ऑल असम देवालय संघाचे अध्यक्ष श्री. सुरेशचंद्र आदींनी सहभाग घेतला.
२. हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन
होजाई आसाममध्ये हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने महाकाल सेनेचे संस्थापक श्री. मिथुन रॉय आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासमवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. अन्य एका बैठकीमध्ये भारतीय युवा मोर्चाचे सदस्य सहभागी झाले होते.
‘प्रागज्योतिषपूर ऐक्य संघा’च्या संस्थापिका श्रीमती लीमा देवी महंतो आणि त्यांचे पदाधिकारी, हिंदु सुरक्षा सेनेचे राज्याध्यक्ष श्री. नयन भट्टाचार्य, राज्य सचिव श्री. कंचन देब नाथ यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. त्यांना समितीच्या धर्मकार्याचा परिचय करून दिला, तसेच हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाविषयी माहिती देण्यात आली.
३. व्याख्यानांचे आयोजन
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘जीवनात साधनेचे महत्त्व’ आदी विषयांवर माहेश्वरी महिला मंडळ, बंगाईगांव आणि गायत्री चेतना केंद्र, गौहत्ती येथे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता कपाडिया आणि अलका माहेश्वरी यांनी केले होते.
४. वैयक्तिक संपर्क अभियान
माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्री. कैलाश काबरा, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी, गौहत्तीचे स्वामी स्वरुपानंद महाराज, बंगाई येथील आश्रमाचे स्वामी रामानंद महाराज, होजाईचे श्री. वृद्ध प्रभुजी, कथाकार लोकनाथ, हिंदुत्वनिष्ठ देवाशिष पाल, सीता आश्रमाच्या संस्थापिका गीत कामरुपा, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शिखा बेसबरुवा गोस्वामी, शास्त्र धर्म प्रचार सभेचे सोबन सेनगुप्ता, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेश कुमार गुप्ता, व्यावसायिक श्री. कल्याण बैरागी, शूरवीर संघटनेचे संस्थापक श्री. वीरेंद्र पांडये, हिंदुत्वनिष्ठ श्री. गणेश दास, कु. मिताली दास, श्री. किशाणु पाल, श्री. धनदीप कलिता तथा शिलाँग (मेघालय)च्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती ईस्टर खरबोमान आदींची भेट घेण्यात आली आणि त्यांच्याशी धर्मकार्याविषयी चर्चा करण्यात आली.