‘पी.एफ्.आय.’सारख्या  देशद्रोही संघटनांचा कायमचा बंदोबस्त करावा !

शिराळा (जिल्हा सांगली) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

शिराळा (जिल्हा सांगली) – केंद्र सरकारने ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर बंदी घालण्याचे स्तुत्य पाऊल उचलले असून ‘पी.एफ्.आय.’सारख्या देशद्रोही संघटनांचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी सैनिक संघटेनेचे श्री. जोतिर्लिंग पाटील आणि श्री. शिवाजी इंगवले, शिवसेना शहरप्रमुख श्री. नीलेश आवटे, ‘कट्टर हिंदु’चे श्री. शरद नायकवडी, हिंदवी स्वराज्य समूहाचे अध्यक्ष श्री. शिवकुमार आवटे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री. श्रेयस महाजन, हिंदु एकताचे श्री. राजवर्धन देशमुख, ‘प्रहार’चे श्री. बंटी नांगरे, धर्मप्रेमी सर्वश्री अशोक म्हसकर, ऋषी भोसले, शुभम देशमुख यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.