मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

२ सहस्र रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

मुंबई – शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकणार्‍या एका धर्मांध महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. (अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारी कारवायांत नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) तिच्याकडून २ सहस्र रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. ती गेल्या काही वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालये येथील मुलांना नशेचे पदार्थ विकत होती. पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

दहिसर भागातील एका उद्यानात शालेय गणवेशातील काही मुले धूम्रपान करत असल्याचे शिवसैनिकांना आढळले. त्यांनी याविषयी शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी यांना कळवले. शाखाप्रमुखांनी मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ३ मुले पळून गेली. त्यानंतर याविषयी पोलिसांना सांगण्यात आले. बोरिवली आणि दहिसर परिसरात नशेचे पदार्थ विकणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले असून ‘त्यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी शिवसेनेने पोलिसांकडे केली.