पंतप्रधानांवर टीका करणारे भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – भंडारा शहरात कार्यरत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका केली. त्याच्या कृत्याची नोंद घेत पोलीस अधीक्षकांनी त्यांना १४ सप्टेंबर या दिवशी निलंबित केले आहे. मागील काही दिवसांपासून हे पोलीस उपनिरीक्षक सामाजिक माध्यमांवर सातत्याने आक्षेपार्ह माहिती टाकत होते. त्यावर कुणीच आक्षेप घेत नसल्याने त्यांचे धाडस वाढले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली. पंतप्रधान आणि इतर नेते यांविषयी आक्षेपार्ह माहिती देऊन समाजात वैमनस्य निर्माण केल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सूर्यवंशी यांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा !