भंडारा येथील महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी ६९८ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !

नागपूर – भंडारा येथील महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) आरोपी मो. इजाज अन्सारी आणि अमित सार्वे यांच्याविरुद्ध ६९८ पानांचे आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट केले आहे. पोलीस अधिकारी आर्. रागसुधा या विशेष पथकाचे नेतृत्व करत आहेत.

१. अत्याचारपीडित महिला ३० जुलै या दिवशी घरगुती वादातून माहेरी जाण्यासाठी निघाली होती. वाटेत श्रीराम उरकुडे (वय ४५ वर्षे) याने २ दिवस तिच्यावर अत्याचार करून तिला अरण्यात सोडून दिले.

२. १ ऑगस्ट या दिवशी दोघांनी तिच्यावर शेतात नेऊन अत्याचार केले आणि तिला तिथेच सोडून पळ काढला.

३. २ ऑगस्ट या दिवशी सकाळी ती महिला विवस्त्र अवस्थेत शेतात गावकर्‍यांना आढळली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी ‘एस्.आय.टी’ची स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

पीडित महिलेला आर्थिक साहाय्य केले !

अनुमाने ३ सहस्र वाहनांची पडताळणी करण्यात आली. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी रागसुधा यांच्या पथकात ८ पोलीस अधिकारी आणि २५ पोलीस कर्मचारी यांनी अथक काम केले. या प्रकरणातील पीडितेला पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, तसेच तिला मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक साहाय्यही करण्यात आले आहे.