हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !
नागपूर, १५ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी येथील ग्रामदेवता श्री टेकडी गणपतीच्या चरणी प्रतिज्ञा करून हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’ला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर बर्याच ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करून प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांच्याविषयी मार्गदर्शक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
क्षणचित्र : लोकमान्यनगर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कापडी फलक लावणे आणि सर्वांना रांगेत उभे करणे इत्यादी सेवा उत्स्फूर्तपणे केल्या.
विशेष : धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी सौ. शिल्पा वराडे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरच्या श्री गणेशमूर्तीसमोर हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करून प्रतिज्ञा घेतली.