शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या दिवशी ते ते श्राद्धविधी करणे आवश्यक असणे आणि तसे न केल्यास लिंगदेह मांत्रिकांच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता असणे
१. बाराव्या दिवशी सपिंडीकरण श्राद्ध करणे, हे पुरेसे नसण्याची कारणे
अ. सर्वसामान्य जिवाकडून केल्या जाणार्या प्रत्येक विधीत भाव नसेल, तर फलप्राप्ती केवळ १० टक्के एवढीच असते.
आ. लिंगदेह हे साधना करणारे नसल्याने त्यांच्या भोवती असणार्या वासनात्मक कोषांतून प्रक्षेपित होणार्या रज-तमात्मक लहरींचे प्रमाण त्यांच्या आसक्तीच्या प्रमाणात पालटणारे असते.
यामुळे प्रत्येक वर्षी श्राद्ध करून साधना न करणार्या जिवाला पुढे जाण्यासाठी बळ उत्पन्न करून देणे, हे पितृऋण फेडणार्या जिवाचे प्रथम कर्तव्य ठरते.
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे श्राद्धविधी न केल्यास होणारी हानी
अ. लिंगदेह ठराविक कक्षेत कित्येक वर्षे अडकून पडतात.
आ. अडकलेले लिंगदेह मांत्रिकांच्या नियंत्रणात जाऊन त्यांच्या सांगण्यावरून कुटुंबियांना त्रास देऊ शकतात. लिंगदेह पुढे न जाता एका ठराविक कक्षेत अडकल्याने त्यांच्या कोषातून प्रक्षेपित होणार्या कुटुंबियांशी निगडित आसक्तीदर्शक देवाणघेवाणयुक्त लहरींच्या प्रादुर्भावाखाली कुटुंबीय राहिल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.९.२००५, सकाळी ११.५०)
संदर्भ- सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’