हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात श्री गणेशोत्सवाला प्रारंभ

कर्नाटक उच्च न्यायालयाची अनुमती

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील ईदगाह मैदानात ३१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. येथे गणेशोत्सव साजरा करण्यास मुसलमानांनी विरोध केला होता आणि हे प्रकरण न्यायालयात गेले होते. श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्यानंतर श्रीरामसेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी पूजा केली. या मंडपामध्ये श्री गणेशमूर्तीच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तसबीरही ठेवण्यात आली आहे. येथे सध्या पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने ३० ऑगस्टला रात्री १० वाजता या प्रकरणी सुनावणी करून हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता. येथील पालिकेने हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली होती. हा आदेश न्यायालयाने कायम ठेवला.