-
महाविद्यालयाने केवळ हिंदु विद्यार्थ्यांना काढून टाकले
-
वाद चिघळल्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनाही काढले
अयोध्या – अयोध्येतील ‘फैज-इ-आम मुस्लिम इंटर कॉलेज’मध्ये कुराण-हनुमान चालिसाच्या सूत्रावरून २ हिंदु आणि २ मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्रबंधक महंमद अख्तर सिद्दिकी यांनी केवळ हिंदु विद्यार्थ्यांवर कारवाई करत त्यांना महाविद्यालयातून काढून टाकले. त्यानंतर वाद चिघळत असल्याचे लक्षात आल्यावर प्रबंधकांनी मुसलमान विद्यार्थ्यांनाही काढून टाकले.
कुरान की जगह रामायण और हनुमान चालीसा पढ़ने की कही थी बात, अयोध्या के मुस्लिम इंटर कॉलेज ने 2 हिंदू छात्रों का काट दिया नाम @AshwiniUpadhyay @ShefVaidya @Sanjay_Dixit @VijayVst0502 @vinod_bansal @snshriraj @RatanSharda55 @VHPDigital https://t.co/ssf8XZzrRa
— Breaking TUBE News (@BreakingTUBE) August 2, 2022
१. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार या मुसलमान महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिकणारा एक हिंदु विद्यार्थी वर्गात कबिराचे दोहे वाचत होता. त्याच वेळी मुसलमान समुदायातील २ विद्यार्थ्यांनी त्याला कुराण वाचण्यास सांगितले.
२. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदु विद्यार्थ्याने त्यांना हनुमान चालिसा आणि रामायण वाचण्यास सांगितले. वाद वाढत गेला आणि प्रकरण मंदिर-मशीदपर्यंत पोचले.
३. हिंदु विद्यार्थ्याला पाठिंबा देण्यासाठी आणखी एक विद्यार्थी आला. दोन्ही गटांमध्ये मारहाण झाली. मुसलमान विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर केवळ २ हिंदु विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले.
४. या प्रकरणी भाजप आणि समाजवादी पक्ष यांचे नेते आमने सामने आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभाग आणि अयोध्येचे जिल्हा प्रशासन यांनी अन्वेषण चालू केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अयोध्येचे पोलीस अधीक्षक राजेश तिवारी यांनी दिली.
५. श्रीरामजन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले, ‘‘मुळात हिंदु विद्यार्थ्यांनी मुसलमान शाळांमध्ये जाणे चुकीचे आहे. तेथे हिंदूंशी भेदभाव केला जातो. अशा घटना अतिशय लज्जास्पद आहेत.’’
संपादकीय भूमिकामुसलमानांकडून चालवण्यात येणार्या शैक्षणिक संस्थांमध्ये कशा प्रकारे भेदभाव केला जातो, हे यातून दिसून येते ! |