देवदर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थानने १० लाख रुपये कमावले !

पहिल्याच श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून भाविकांची लूट !

नाशिक – ‘जय भोलेनाथा’चा गजर करत १ लाखांहून अधिक भाविकांनी १ ऑगस्टच्या पहिल्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्र्यंबकेश्वर देवस्थानने पैसे देणार्‍या भाविकांना अडीच घंट्यांत देवाचे दर्शन, तर विनामूल्य दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ६ घंट्यांहून अधिक वेळ रांगेत उभे ठेवले. देवस्थानकडून प्रतिव्यक्ती २०० रुपये आकारून दर्शन देण्यात येत होते. सायंकाळपर्यंत ५ सहस्रांहून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला. त्यामुळे १० लाख रुपयांहून अधिक उत्पन्न देवस्थानला मिळाले आहे.

भाविकांची गर्दी पाहून ३ वेळा सुशल्क दर्शन (पेड दर्शन) बंद करावे लागले. कोरोना महामारीच्या कालावधीनंतर आलेला हा पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची पुष्कळ गर्दी होती. त्यातच मंदिरात येणार्‍या भाविकांची वाहने लावण्यासाठीचे वाहनतळ शहराच्या बाहेर दूरवर नेल्याने भाविकांचे हाल झाले.

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • पैसे घेऊन भाविकांना दर्शन देणे, ही पद्धत अशास्त्रीय आहे ! दर्शनासाठी शुल्क आकारायला मंदिर हे काही मनोरंजनाचे ठिकाण नाही ! सरकारीकरण झालेल्या मंदिरांकडे प्रशासन ‘पैसे कमावण्याचे साधन’ म्हणून पहात असल्यानेच ही दुःस्थिती झाली आहे !