एकाच धर्मातील २ पंथांमधील वादामध्ये ‘पूजास्थळ कायदा १९९१’ लागू करू शकत नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

नवी देहली – एकाच धर्मातील दोन पंथांमधील वादामध्ये ‘पूजास्थळ कायदा १९९१’ लागू करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. जैन समुदायाच्या एका पंथाने त्याच्या धार्मिक स्थळांचे धर्मांतर केल्याचा आरोप करणार्‍या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, या कायद्याचे उद्दिष्ट धार्मिक स्थळांना भिन्न धार्मिक संप्रदायाच्या किंवा त्याच धर्माच्या भिन्न विभागाच्या प्रार्थनास्थळांमध्ये रूपांतरित होण्यापासून संरक्षण देणे आहे; पण याचिका करण्यात आलेला वाद २ धर्मांमधील वाद नाही. खटला एकाच धर्माच्या वेगळ्या संप्रदायाच्या विरोधात आहे. हे धर्मांतराचे प्रकरण नाही. त्यामुळे यावर ‘पूजास्थळ कायदा १९९१’ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही. ‘तुम्ही योग्य प्रकारे खटला प्रविष्ट केला पाहिजे आणि तेथे तुमचे उपाय शोधले पाहिजेत’, असे न्यायालयाने अधिवक्त्यांना सांगितले.