‘पोलखोल’ या ‘फेसबूक’ गटाच्या माध्यमातून महिलांची अपकीर्ती !

  • कठोर कारवाईसाठी मळेगाव (सोलापूर) येथील ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे धाव

  • ३ संशयित धर्मांधांवर गुन्हा नोंद

  • पोलीस अधीक्षकांची भेट घेताच गटावरील पोस्ट काढल्या !

मळेगाव (जिल्हा सोलापूर) – येथील ‘पोलखोल’ या ‘फेसबूक’ गटामध्ये स्थानिक महिलांविषयी आक्षेपार्ह आणि महिलांची अपकीर्ती करणार्‍या पोस्ट ठेवल्या जात आहेत. गावातील महिला सरपंचांविरोधातही आक्षेपार्ह पोस्ट गटामध्ये ठेवल्या गेल्या. मळेगावातील ५० ते ६० नागरिकांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन संबंधित फेसबूक गटाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पांगरी पोलिसांनी एजाज शेख, अमर शेख आणि नवाज शेख या संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

‘फेसबूक’वरील पोलखोल या गटाच्या माध्यमातून महिलांची अपकीर्ती केल्याने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, तर काहींचे संसार मोडले जात आहेत. गावातील प्रतिष्ठित पुरुष आणि महिला यांची अपकीर्ती करणार्‍या पोस्ट ठेवल्या जात आहेत. (महिलांचे जगणेही कठीण करणार्‍या संबंधित आरोपींची सखोल चौकशी करून  त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास पुन्हा असे वागण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • महिलांवर अत्याचार करणे, त्यांची अपकीर्ती करणे यांमध्ये धर्मांधांच्या असलेल्या सहभागातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते. धर्मांधांना प्रत्येक गुन्ह्यात कठोर शिक्षाच होणे आवश्यक !
  • गावातील महिला पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर काही वेळातच संबंधित ‘फेसबूक’ गटावरील पोस्ट आरोपींनी पुसल्या. ‘यापूर्वी अनेक वेळा ‘पोस्ट ठेवणे आणि पुसणे’, असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधित युवकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा’, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली.