पत्राचाळ घोटाळा प्रकरण
मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील तक्रारदार स्वप्ना पाटकर यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दिलेला जबाब पालटावा, यासाठी जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी केली आहे. ही धमकी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चालू असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने असावी, असे पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
१. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळ्याची अंमल बजावणी संचालनालय चौकशी करत आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. संचालनालयाने त्यांचा जबाब नोंदवला आहे.
२. किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव घेतले असल्याचे सांगावे, असे पाटकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
३. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांची चौकशी केली आहे. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांनी घटस्फोट घेतला आहे.