अंबरनाथ रेल्वेस्थानकात बाँब ठेवल्याची माहिती देणाऱ्या दोघांना अटक !

अंबरनाथ – येथील रेल्वेस्थानकात एकाने बाँब ठेवला आहे, अशी माहिती एका व्यक्तीने रेल्वे सेवा संपर्क कक्षाला दिली. त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी संपर्क क्रमांकावरून तांत्रिक माहितीच्या आधारे अतुल प्रजापती आणि प्रदीप प्रजापती यांना अटक केली.

माहिती मिळाल्यावर बाँबशोधक पथकासह ठाणे ते बदलापूर येथील १५० पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वेस्थानकात आले. तेथे केलेल्या पडताळणीत काहीही आक्षेपार्ह असे आढळून आले नाही.

संपादकीय भूमिका

पोलीस प्रशासनाचे श्रम, वेळ आणि पैसा खर्च करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी !