अणूयुद्ध झाल्यास सौर ऊर्जा उपयोगी पडण्याची शाश्वती नसणे

आगामी अणूयुद्धाच्या वेळी स्वत:च्या रक्षणासाठी आध्यात्मिक पातळी आणि साधना महत्त्वाची असून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

श्री. शॉन क्लार्क

१. प्रश्न

अणूयुद्ध झाल्यास ‘त्या वेळी सौर ऊर्जेचा कितपत उपयोग करता येईल ?’, हा प्रश्न नक्कीच पुढे येईल. असा प्रश्न येण्यामागे पुढील २ कारणे आहेत.

१ अ. सूर्यकिरणांचा प्रभाव न्यून होणे : छोट्याशा अणूयुद्धानेही पुष्कळ मोठ्या प्रमाणात काजळी पसरून ती पृथ्वीभोवती एक जाड आवरण निर्माण करते. त्यामुळे सूर्यकिरण अगदी अल्प प्रमाणात पृथ्वीवर पोचू शकतील. त्यामुळे सौर ऊर्जेच्या यंत्रणेची क्षमता अतिशय न्यून होईल.

१ आ. न्यूक्लिअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स : वातावरणात पुरेशा आकाराच्या अण्वस्त्रांचा स्फोट झाला, तर त्यांतील विद्युत् चुंबकीय ऊर्जेमुळे ‘इलेक्ट्रॉनिक सर्किट’चा वापर असलेल्या सर्व वस्तू कायमच्या निकामी होऊ शकतील. त्यामुळे चारचाकी वाहने, विमाने, वीजवाहक तारांचे जाळे (इलेक्ट्रिक ग्रीड) आणि घरातील सौर ऊर्जा यंत्रणा बिघडू शकतील. आण्विक विद्युत् चुंबकीय ऊर्जेमुळे (‘न्यूक्लिअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स’मुळे) सौर ऊर्जेची यंत्रणा जरी काही प्रमाणात बिघडली, तरी विद्युत्यंत्रणा बिघडण्याची शक्यता अधिक आहे.

२. उत्तर

अ. ‘छोट्याशा अणूयुद्धानेही समाजावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. जे अणूस्फोट झालेल्या भागाजवळ रहात असतील, त्यांना ‘वीज नाही’, या चिंतेपेक्षा ते मरण्याचीच चिंता अधिक आहे.

आ. जरी आपत्काळासाठी सौर ऊर्जा आणि वायू ऊर्जा हे उपाय सांगितले आहेत, तरी या गोष्टी ‘अणूयुद्धात चालतील कि नाही ?’, याची शाश्वती नाही.

इ. अशा प्रसंगात स्थूल स्तरावरील धोका न्यून करण्याच्या दृष्टीने बुद्धीच्या स्तरावर कितीही विचारविनिमय केला, तरी ते निरर्थक आणि निराशाजनकच असेल.

ई. आपत्काळाला तोंड देण्यासाठी मनात आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे; कारण आपत्काळात स्वतःचे रक्षण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या सूत्रांचा विचार करणे आवश्यक आहे.

१. प्रत्येक मनुष्याचे जीवन हे त्याचे प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म यांवर अवलंबून आहे. कुणालाही प्रारब्ध टाळता येत नाही. त्याला ते भोगावेच लागते. वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत मानवाच्या समष्टी प्रारब्धाचा व्यक्तीच्या जीवनावर अधिक प्रमाणात परिणाम होणार आहे. या काळात समष्टी प्रारब्ध पुष्कळ कठीण असणार आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

२. तीव्र प्रारब्धावर केवळ साधनेनेच मात करता येऊ शकते. सध्याच्या काळात बरेच लोक साधना करत नाहीत. त्यामुळे जगाच्या लोकसंख्येपैकी बरेच लोक मृत्यू पावतील.

३. जे लोक साधना करतील, ते या आपत्काळात वाचतील. या आपत्काळात वाचण्यासाठी व्यक्तीची आध्यात्मिक पातळीही तितकीच महत्त्वाची आहे.

४. ज्यांची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, ते देवाच्या कृपेने वाचतील. त्यामुळे ज्या लोकांमध्ये साधना करण्याची क्षमता आहे, त्यांना साधना शिकवणे महत्त्वाचे आहे; जेणेकरून ते साधना करून ५० टक्के आध्यात्मिक पातळी गाठू शकतील.

५. अणूयुद्ध झाल्यावर व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीनुसार देव तिच्या भोवतालच्या भागाचे अण्वस्त्रांतील घातक किरणांपासून रक्षण करील. या भागातील केवळ साधकांचेच नव्हे; तर झाडे, प्राणी इत्यादींचेही रक्षण होईल.’

– श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), संपादक, एस्.एस्.आर्.एफ. आणि संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.७.२०२०)