जळगाव येथील घटना !
जळगाव – येथे शहरात विनाकारण घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या चौघा तरुणांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यावर चॉपर आणि फायटर यांनी आक्रमण केले. (आक्रमक वृत्तीचे तरुण ! – संपादक) लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घराच्या आवारात घुसून कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. २५ जूनच्या रात्री ही घटना घडली. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात महानगरपालिका कर्मचारी संजय प्रभाकर बागुल (वय ५२ वर्षे) हे घायाळ झाले आहेत.
संबंधित ४ तरुण बागुल यांच्या चारचाकी वाहनावर जोरजोरात थापा मारून शिवीगाळ करत होते. यामुळे बागुल यांनी त्या तरुणांना हटकले होते. त्यांच्यापैकी एकाचा भ्रमणभाष बागुल यांनी पोलिसांच्या कह्यात दिला.
संपादकीय भूमिका
|