मुंबई – संपत्तीच्या वादातून तुषार शिंदे (वय ५५ वर्षे) या माजी सैनिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायदालनात सुनावणी चालू असतांनाच आत्महत्येचा प्रयत्न केला. आईसमवेत चालू असलेल्या संपत्तीच्या वादातून त्यांनी हा प्रयत्न केला. (सैनिकी शिक्षणात धर्मशिक्षण दिल्यास सैनिकांचे मनोबल वाढून त्यांना मानसिक स्थैर्य मिळेल ! – संपादक)
न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या एकलपिठासमोर त्यांच्या प्रकरणावर सुनावणी चालू होती; मात्र आदेश विरोधात गेल्याने त्यांनी न्यायमूर्तींच्या दिशेने जाऊन कटरने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शिंदे यांना पोलिसांनी कह्यात घेतले.