सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंचाने गावातील शौचालयांमध्ये लावल्या शिवलिंग आणि ॐ असलेल्या टाइल्स !

बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांना निवेदन देतांना

सीतापूर (उत्तरप्रदेश) – सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद तालुक्यातील बेरौरा गावामध्ये मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंच रेशमा यांनी सरपंच असतांना काही शौचाले बांधली होती. त्यांतील १ शौचालय ८ जून या दिवशी उघडण्यात आले असता त्यामध्ये शिवलिंगाचे चित्र आणि ॐ लिहिलेल्या टाइल्स लावल्याचे आढळून आले. ही घटना समोर येताच गावात तणाव निर्माण झाला. यामुळे येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवणयात आला आहे. पोलिसांनी रेशमा, त्यांचा पती बुनियाद आणि नसीमुल्ला या तिघांविरुद्द गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. ४ वर्षांपासून या टाइल्स या शौचालयात लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

बजरंग दलाचे जिल्हा संयोजक आणि या प्रकरणी पोलिसांत तक्रार करणारे संदीप अवस्थी यांनी सांगितले की, रेशमा या पुन्हा निवडून आल्या आहेत. त्यांनी त्यांच्या मागच्या कार्यकाळात या टाइल्स लावून घेतल्या आहे. संपूर्ण गावात अशा प्रकारच्या टाइल्स लावण्यात आल्या होत्या. त्याविषयी तक्रार केल्यानंतर काही शौचालयांतून त्या काढण्यात आल्या; मात्र अद्यापही काही शौचालयांमध्ये त्या तशाच आहे. सध्या जगभरात नूपुर शर्मा यांच्याप्रकरणी वाद चालू झाला आहे, मग अशा घटनांमुळे आमच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत का ?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

संपादकीय भूमिका

नूपुर शर्मा यांनी पैगंबरांचा कथित अवमान केल्यावर थयथयाट करणारे मुसलमान आणि इस्लामी देश या घटनेविषयी तोंड उघडतील का ?