साधकाचा स्वभाव अंतर्ज्ञानाने अचूक ओळखून त्यानुरूप त्याला मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एकदा एका राज्यातील साधकाला समाजातील एका कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण मिळाले. त्या साधकाच्या मनात ‘कार्यक्रमाला जावे कि नाही ?’, असा प्रश्न होता. त्याच कालावधीत माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली आणि मी त्यांना त्या साधकाला पडलेला प्रश्न विचारला. ते म्हणाले, ‘‘त्या साधकाला सांगा की, इकडे-तिकडे फिरण्यात वेळ न घालवता साधनेकडे लक्ष द्या.’’

श्री. राम होनप

हे उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले; कारण तो साधक स्वतःच्या साधनेकडे लक्ष न देता समाजात चालू असलेल्या विविध कार्यक्रमांना जाण्यात अनावश्यक वेळ घालवत असतो. त्या साधकाचा सतत इकडे-तिकडे फिरण्याचा स्वभाव मी परात्पर गुरु डॉक्टरांना स्थुलातून सांगितला नव्हता. तो त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखला होता.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२२)