परात्पर गुरु डॉ. आठवले हे पाणी घालत असलेल्या तुळशीच्या रोपाच्या फांद्या, पाने आणि मंजिऱ्या लालसर अन् गुलाबी रंगाच्या दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे नियमितपणे पाणी घालत असलेल्या त्यांच्या खोलीबाहेरील आगाशीतील तुळशीच्या रोपाच्या फांद्या, पाने आणि मंजिऱ्या २४.१.२०१९ या दिवशी एकदम लालसर दिसू लागल्या. त्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

१. तुळशीच्या रोपाचे माहात्म्य

कु. मधुरा भोसले

तुळस ही वनस्पती मुळात सात्त्विक असून तिच्यामध्ये श्रीविष्णूचे निर्गुण-सगुण स्तरावरील तत्त्व कार्यरत असते. त्यामुळे श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे श्रीविष्णूच्या पूजनात त्याला तुळशीदल किंवा मंजिऱ्या वाहिल्या जातात. रामतुळशीमध्ये रामतत्त्व आणि कृष्णतुळशीमध्ये कृष्णतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे तुळशीला दिव्यत्व प्राप्त झाल्याने तिला ‘तुलसीदेवी’ असेही संबोधले जाते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले नियमितपणे पाणी घालत असलेल्या तुळशीच्या रोपाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि तिचे सूक्ष्म स्तरावर होणारे कार्य

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले नियमितपणे पाणी घालत असलेल्या तुळशीचे रोप बहरलेले असून त्याच्याकडे पाहिल्यावर चैतन्य आणि आनंद जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. त्यामुळे ते जेव्हा तुळशीच्या रोपाला पाणी घालतात, तेव्हा त्यांच्या देहातून प्रक्षेपित झालेले चैतन्य तुळशीला पाण्याच्या रूपाने मिळते. त्यामुळे या तुळशीचे रोप बहरले असून तिच्याकडे पाहिल्यावर चैतन्य आणि आनंद जाणवतो.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले नियमितपणे पाणी घालत असलेल्या तुळशीच्या रोपामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व पंचतत्त्वांच्या स्तरांवर पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले नियमितपणे पाणी घालत असलेल्या तुळशीच्या रोपामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले आहे. या तुळशीच्या रोपामुळे परात्पर गुरुदेवांची खोली आणि सभोवतालचा परिसर येथे पंचतत्त्वांच्या स्तरांवर शक्ती आणि चैतन्य प्रक्षेपित झाल्यामुळे सभोवतालच्या वायूमंडलाचे शुद्धीकरण होते.

३. तुळशीच्या रोपाची पाने आणि मंजिऱ्या स्थुलातून लालसर अन् गुलाबी दिसण्यामागील कार्यकारणभाव अन् सूक्ष्म स्तरावर होणारे तारक आणि मारक स्वरूपांचे कार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या त्यांच्या खोलीबाहेरील आगाशीतील तुळशीची लालसर गुलाबी झालेली पाने आणि मंजिऱ्या

 

तुळशीच्या रोपामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झालेले आहे. ते तत्त्व पंचतत्त्वांपैकी आवश्यक असणाऱ्या तत्त्वाच्या स्तरांवर वायुमंडलात प्रक्षेपित होते. जेव्हा हे तत्त्व तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत होते, तेव्हा तुळशीची पाने आणि मंजिऱ्या यांच्या रंगामध्ये स्थुलातून पालट होतो.

३ अ. तुळशीच्या रोपाकडून मारक स्वरूपाचे कार्य झाल्यामुळे तिची पाने आणि मंजिऱ्या यांचा रंग स्थुलातून लालसर दिसणे : जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्ती सूक्ष्मातून आक्रमण करतात, तेव्हा या तुळशीच्या रोपातून श्रीविष्णूची मारक शक्ती प्रक्षेपित होऊन परात्पर गुरुदेवांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध होऊन परात्पर गुरुदेवांचे रक्षण होते. तेव्हा तुळशीच्या रोपाची पाने आणि मंजिऱ्या लालसर रंगाच्या दिसतात.

३ आ. तुळशीच्या रोपाकडून तारक स्वरूपाचे कार्य झाल्यामुळे तिची पाने आणि मंजिऱ्या यांचा रंग स्थुलातून गुलाबी दिसणे : जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती न्यून होऊन त्यांना थकवा येतो, तेव्हा तुळशीमध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तारक तत्त्व कार्यरत होऊन तुळशीच्या रोपातून प्राणवायूचे प्रक्षेपण होते. तेव्हा तुळशीची पाने आणि मंजिऱ्या यांचा रंग गुलाबी दिसतो. अशा प्रकारे परात्पर गुरुदेवांच्या स्थितीनुसार त्यांच्या खोलीबाहेरील आगाशीतील तुळशीच्या रोपामध्ये स्थुलातून पालट होतात. यावरून ‘तुळशीच्या रोपाचे कार्य ईश्वरेच्छेने कसे चालू असते’, हे सूत्र शिकायला मिळते.

‘श्रीगुरूंच्या कृपेमुळेच या दैवी पालटांमागील कार्यकारणभाव उमजला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)

वाचकांना निवेदन !

‘छपाईतील तांत्रिक अडचणींमुळे येथे प्रसिद्ध केलेली छायाचित्रे जशी आहेत, तशी छापून येतीलच’, असे नाही. यावर उपाय म्हणून आणि प्रत्येकाला हे पालट दिसावेत अन् विषय कळावा, यासाठी हे पालट संगणकाच्या साहाय्याने अधिक उठावदार केले आहेत, याची नोंद घ्यावी. मूळ छायाचित्रे सुस्पष्ट पहाण्यासाठी वाचकांनी ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावरील https://bit.ly/3aeKwpI या मार्गिकेला भेट द्यावी. (यातील काही अक्षरे ही ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

संत पाणी घालत असलेल्या तुळशीच्या रोपातील बुद्धीअगम्य पालटांविषयीचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या तुळशीच्या फांद्या, पाने आणि मंजिऱ्या लालसर  गुलाबी होण्यामागे काय कारण आहे ?’ या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू. – व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. आशिष सावंत

ई-मेल : [email protected]

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.