पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

१०.४.२०२२ या दिवशी मूळ वर्धा येथील; मात्र रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या संतपदी विराजमान झाल्या. या सोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

१. संतपद घोषित करण्यापूर्वी

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

कार्यक्रमाच्या प्रारंभी एक प्रयोग करण्यात आला. त्यात एका साधिकेच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेली भावार्चना उपस्थितांना ऐकवण्यात आली. सूत्रसंचालन करणाऱ्या साधिकेने ‘भावार्चना ऐकून काय जाणवते ?’ याचा अभ्यास उपस्थितांना करण्यास सांगितला, त्या वेळी ‘भावार्चना कोणाच्या आवाजात आहे ?’ हे सांगण्यात आले नव्हते. या प्रयोगाच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अ. ध्यान करतांना साधकाची कुंडलिनी वरच्या दिशेने प्रवास करते, त्याप्रमाणे साधिकेने केलेली भावार्चना ऐकतांना माझी कुंडलिनी वरच्या दिशेने प्रवास करू लागली आणि ती विशुद्धचक्राच्या ठिकाणी स्थिर झाली. त्या वेळी माझ्या तोंडात गोड चव निर्माण झाली.

आ. भावार्चनेत साधिका श्रीकृष्णाच्या रासलीलेच्या प्रसंगाचे वर्णन करतांना म्हणाली, ‘श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे’, त्या वेळी सूक्ष्मातून ‘श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे’, असे मला दृश्य दिसले आणि ‘वातावरण श्रीकृष्णमय झाले आहे’, असे मला जाणवले.

श्री. राम होनप

इ. साधिकेच्या भावपूर्ण आवाजाने वातावरणात सूक्ष्मातून श्रीकृष्णाची २ सुदर्शनचक्रे निर्माण झाली आणि ती ‘अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांतील काळी शक्ती स्वतःकडे खेचून घेत आहेत’, असे मला जाणवले.

ई. ‘पूर्वीच्या काळी गोपी श्रीकृष्णाला आर्ततेने आळवत होत्या, त्याप्रमाणे भावार्चना सांगणारी साधिका गोपीप्रमाणे श्रीकृष्णाला आळवत आहे’, असे मला जाणवले आणि ‘ही गोपी सामान्य नसून ‘संत गोपी’ आहे’, असा विचार माझ्या मनात आला.

उ. साधिकेच्या आवाजाचा परिणाम चौथ्या पाताळातील वाईट शक्तींवर होत होता. साधिका भावार्चनेत श्रीकृष्णाच्या रासलीलेचे वर्णन करत होती. रासलीलेच्या प्रसंगाचे विडंबन करण्यासाठी चौथ्या पाताळातील वाईट शक्तींनी रासलीलेत श्रीकृष्णाच्याभोवती गोल आकारात फेर धरून गोप – गोपी नृत्य करायचे, त्याप्रमाणे नृत्य करण्यास प्रारंभ केला होता.

ऊ. साधिका सांगत असलेल्या भावार्चनेत काही वेळा ध्वनीमुद्रित केलेला बासरीचा नाद होता. ‘बासरीच्या नादाने वातावरणाची शुद्धी होत आहे आणि साधिकेच्या आवाजातून अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांना चैतन्य मिळत होत आहे’, असे मला जाणवले. यातून ‘बासरीचा नाद आणि साधिकेचा आवाज यांचा एकत्रित परिणाम समष्टीवर कसा होतो ?’, याचा अभ्यास करता आला.

ए. साधिकेची भावार्चना चालू असतांना चौथ्या पाताळातील एक वाईट शक्ती अन्य एका वाईट शक्तीला म्हणाली, ‘अजून एकाची भर पडली.’ त्या वेळी याचा मला अर्थ समजला नाही. थोड्या वेळाने ‘भावार्चनेतील आवाज साधिका श्रीमती डगवार यांचा असून त्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे सांगण्यात आले.

एखादा साधक संतपदी विराजमान झाल्याच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील बातमीत ते सनातन संस्थेचे कितवे संत आहेत ? ती संख्या प्रसिद्ध केली जाते, उदा. सनातन संस्थेचे ११० वे संत, १११ वे संत. चौथ्या पाताळातील त्या अनिष्ट शक्तीला थोड्या वेळाने ‘एक साधिका संतपदी विराजमान होणार आहे’, हे आधीच सूक्ष्मातून समजल्याने तिने ‘अजून एकाची भर पडली’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, असे मला जाणवले.

ऐ. कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारी साधिका एका प्रसंगी पुढील वाक्य म्हणाली, ‘कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वनीमुद्रित केलेला एक आवाज ऐकवण्यात आला. त्यात त्रेतायुगातील श्रीरामाचे वर्णन होते. त्या काळी श्रीरामाचे कार्य होते. त्यानंतर ध्वनीमुद्रित केलेला दुसरा आवाज ऐकवण्यात आला. त्यात द्वापरयुगातील श्रीकृष्णाच्या रासलीलेचे वर्णन होते. त्या काळी श्रीकृष्णाचे राज्य होते.’ हे वाक्य पूर्ण होताच चौथ्या पाताळातील एक अनिष्ट शक्ती लगेच म्हणाली, ‘आता (कलियुगात) आमचे (अनिष्ट शक्तींचे) राज्य आहे.’

२. संतपद घोषित झाल्यानंतर : पू. डगवारकाकू यांच्या पाठीमागे सूक्ष्मातून पिवळ्या रंगाचे दिव्य कमळ मला दिसले. त्यातून ‘पू. डगवारकाकू यांना समष्टी कार्य करण्यासाठी आवश्यक ते ईश्वरी ज्ञान प्राप्त होणार आहे’, असे मला जाणवले.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक