तुझ्यासारखे घडता यावे, हीच प्रार्थना तुझ्या चरणी बिंदाई !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण करत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति बिंदाआई (टीप १),
केवळ तुझ्या प्रीतीने बांधिले आम्हासी ।
तुझ्या केवळ स्मरण मात्रे मनी आनंद तू देसी ।। १ ।।

तुझे सुंदर रूप, तुझे तेज आणि तुझी मधुर वाणी ।
भावगंगेत डुंबूनी भक्तीकडे नेई ।। २ ।।

तुझ्या स्मित हास्ये होतसे चैतन्याची उधळण ।
तुझ्या नेत्र कटाक्षाने स्थिर होतसे मन ।। ३ ।।

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

बिंदाई तू समष्टीसाठी घडवीशी आम्हाला ।
आम्ही चुकलो, तरी बोट धरूनी पुढे नेशी पुनः पुन्हा ।। ४ ।।

तुझ्यासारखा समष्टी ध्यास मनी असू दे आई ।
त्यासाठी तूच आम्हाला शक्ती आणि भक्ती दे आई ।। ५ ।।

समष्टीसाठी घडवून जीवन उद्धरून न्यावे आई ।
शरण आले तुझ्या चरणी समर्पित करून घे आई ।। ६ ।।

श्री गुरूंचे स्मरण होऊनी कृपेचा वर्षाव केलास आई ।
तुझ्यासारखे घडता यावे, हीच प्रार्थना तुझ्या चरणी आई ।। ७ ।।

टीप १ : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

– श्री गुरुचरणांची धूलिकण,

श्रीमती मंदाकिनी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२१)

(ही कविता श्रीमती मंदाकिनी डगवार संत घोषित होण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावापूर्वी (पू.) लिहिले नाही.)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक