काठमांडू (नेपाळ) – लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी ही तीनही गावे नेपाळचे भाग आहेत, असा खोटा दावा नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी केला. यापूर्वी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या कार्यकाळातही नेपाळने या भागांवर दावा केला होता.
पंतप्रधान देऊबा पुढे म्हणाले की, नेपाळ सरकारने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. शेजारी आणि इतर देशांशी संबंधित गोष्टींमध्ये आम्ही एकमेकांना लाभ होईल, असे धोरण अवलंबतो. आपल्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी सरकार सदैव तत्पर असते. सीमाप्रश्न हा संवेदनशील विषय आहे. आम्ही जाणतो की, हे प्रश्न संवादातून सोडवले जाऊ शकतात. या दिशेने वाटचाल करत राजनैतिक माध्यमातून प्रयत्न करत आहोत.
संपादकीय भूमिकाचीनचा बटीक बनलेल्या नेपाळने भारताशी वैर पत्करून आत्मघात करून घेऊ नये, असे नेपाळच्या हिंदु जनतेने त्यांच्या शासनकर्त्यांना सांगितले पाहिजे, अन्यथा चीनच्या नादी लागल्याने श्रीलंकेची जी स्थिती झाली आहे, तशीच स्थिती नेपाळची पुढे होऊ शकते ! |