निखिल भामरे ठाणे पोलिसांच्या कह्यात !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याचे प्रकरण

(गोलात) निखिल भामरे

ठाणे, १८ मे (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट करणारे निखील भामरे यांचा नाशिक पोलिसांकडून ठाणे पोलिसांनी ताबा घेतला आहे. त्यांना नाशिक न्यायालयात उपस्थित केले असतांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांचा ताबा घेतला. ठाणे पोलिसांकडून निखिल यांना १९ मे या दिवशी ठाणे न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निखील भामरे त्यांच्या ट्वीटचे छायाचित्र शेअर करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.