डोंबिवलीत भुरट्या चोऱ्यांच्या घटनांत वाढ !

असुरक्षित डोंबिवली शहर !

प्रतीकात्मक छायाचित्र

ठाणे, १३ मे (वार्ता.) – डोंबिवली शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरून दुपारी २ वाजता डॉ. मीनाक्षी संघवी त्यांच्या पतीसह दुचाकीवरून जात होत्या. त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना जोरदार धक्का दिला. या झटापटीत डॉक्टर महिलेच्या हातातील महागडा भ्रमणभाषसंच हिसकावून चोरटे पळून गेले. रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळून चोरट्यांचा शोध पोलिसांनी चालू केला आहे. डोंबिवली भागात दुचाकीवरून येऊन सोनसाखळी आणि भ्रमणभाषसंच चोरण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. ‘पोलिसांनी गस्त घालून असे प्रकार थांबवावेत’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.