पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – ज्या लोकांना वाटते की पाकिस्तान त्यांच्यासाठी योग्य जागा आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, भारतात त्यांच्या विरोधात कधी काही अयोग्य करण्यात आले नाही, असे विधान केरळ उच्च न्यायालयाने केले आहे. भारताच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याच्या आणि काश्मीरमध्ये शिबिरे आयोजित करून जिहादी आतंकवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणी १० जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवतांना न्यायालयाने हे विधान केले. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) न्यायालयाने या १० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

न्यायालयाने म्हटले की,

१. कट्टरतावादी किंवा उग्र विचारांच्या लोकांनी फाळणीनंतरचा इतिहास पहावा. त्यांना लक्षात येईल की, सीमेपलीकडची स्थिती इतकी चांगली नाही, जितकी येथे असलेल्यांना चांगली वाटते.

२. पाकिस्तानसमवेत झालेल्या संघर्षाच्या काळातही हिंदूबहुल भारतात मुसलमानांना बंदी बनवण्याची घटना कधीच झाली नाही.

३. स्वर्गाच्या सुखासाठी ज्यांनी मनुष्यांना आणि देशाच्या नागरिकांना ठार केले, त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे जीवन नरकसमान करण्यात आले आहे. ते लाजेच्या दुःखामध्ये बुडाले आहेत.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाने जे सांगितले, ते कधी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी सांगण्याचे धाडस करतील का ?