भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीपुत्रांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली, घरादारावर तुळशीपत्र ठेवून या मातृभूमीसाठी शौर्य गाजवले; पण आजची स्थिती पाहिली, तर ज्या राष्ट्रपुरुषांनी वा क्रांतीकारकांनी या भारतमातेसाठी सर्वस्व दिले, त्यांच्या शौर्याचा इतिहास शिकवला जात नाही. गेल्या ७४ वर्षांमध्ये आम्हाला योग्य शौर्याचा इतिहास न शिकवल्यामुळे आज पुन्हा एकदा भारतमातेचे लचके तोडले जात आहेत. हिंदूंमध्ये असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे. भारतमातेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. त्यासाठीक आपण सर्वांनी पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया.