रस्ते अडवून धार्मिक कार्यक्रम करू नका !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांची विविध सणांविषयी सूचना

लक्ष्मणपुरी (लखनौ)- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईद, परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया या सणांसंदर्भात अधिकार्‍यांना सर्व सण शांततेत पार पडावेत यासाठी सूचना दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीत सांगितले की, धार्मिक नेत्यांशी संवाद साधा आणि  रस्ता अडवून किंवा वाहतूक विस्कळीत करून कुठलाही धार्मिक कार्यक्रम होणार नाही, याची काळजी घ्या. त्यासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना  सांगितले.