आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक यांच्या शुभहस्ते १५ एप्रिल २०२२ या दिवशी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी नामजपांविषयी थोडक्यात माहिती सांगण्यात आली. देवाच्या कृपेने तेव्हा माझ्याकडून झालेले सूक्ष्मातील परीक्षण येथे देत आहे.
१. पू. फाटककाकांच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन होणे
कार्यक्रमाच्या आरंभी वातावरणात थोड्या प्रमाणात दाब जाणवत होता. जेव्हा पू. फाटककाकांनी नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे लोकार्पण केले, तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे अस्तित्व जाणवले. त्यांच्या देहातील चैतन्य त्यांच्या हातातून ‘आयपॅड’ (भ्रमणभाषसारखा एक प्रकार) मध्ये संक्रमित झाले.
२. पू. फाटककाकांनी नामजप चालू होण्याची कळ दाबल्यावर ‘आयपॅड’मध्ये संक्रमित झालेले चैतन्य नामजपातील नादशक्तीच्या माध्यमातून वातावरणात पसरणे
पू. फाटककाकांनी नामजप चालू होण्याची कळ दाबल्यावर नामजपातील नादशक्तीमुळे संपूर्ण वातावरण चैतन्यदायी आणि आनंदमय झाले.
३. शून्य, महाशून्य आणि निर्गुण या नामजपांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
४. शून्य, महाशून्य आणि निर्गुण हे नामजप लोकार्पण केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
४ अ. नामजपातून प्रक्षेपित होणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण
४ आ. नामजपातून प्रक्षेपित होणाऱ्या विविध पंचमहाभूतांचे प्रमाण
४ इ. नामजप ऐकल्यामुळे विविध देहांना होणारा लाभ
कृतज्ञता
‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे शून्य, महाशून्य आणि निर्गुण हे नामजप ऐकल्यामुळे होणाऱ्या लाभांचे ज्ञान मिळाले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)(सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०२२)
|