पाकने अफगाणिस्तानातील आतंकवाद्यांवर केलेल्या हवाई आक्रमणात ३० जण ठार

पाकच्या सैन्यावर आतंकवादी आक्रमण झाल्यामुळे पाकचे प्रत्युत्तर

पाक त्याच्या सैन्यावर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांवर दुसर्‍या देशात जाऊन कारवाई करू शकतो, तर पाकमधील आतंकवाद्यांनी भारतात कारवाया केल्यावर भारत पाकमध्ये जाऊन सातत्याने अशी कारवाई का करू शकत नाही ? – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या वायूदलाने अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील स्पुरा जिल्हा, तसेच कुनार प्रांतात केलेल्या आक्रमणामध्ये ३० जण ठार झाले. त्यामध्ये महिला आणि बालके यांचाही समावेश होता. आतंकवाद्यांचा बीमोड करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पाकने केला आहे. पाकच्या वायूदलाच्या २६ विमानांनी हे आक्रमण केले.

काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या आक्रमणात ७ सैनिक ठार झाले होते. दुसर्‍या एका आक्रमणात एका सैनिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पाकने ही कारवाई केली.