मंड्या (कर्नाटक) येथे मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याचे अभियान !

मंड्या (कर्नाटक) – मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करू नये, अशी मोहीम येथे राबवण्यात येत आहे. मेलुकोटे चेलुवनारायणस्वामी देवालयाचे पुरोहित श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली अभियानाला प्रारंभ झाला आहे.

श्रीनिवास यांनी सांगितले की, मुसलमानांनी देवतांची मूर्ती घडवणे योग्य नाही. ते हिंदूंचे शास्त्रदेखील स्वीकारत नाहीत. शास्त्राची त्यांना अनुमती नाही. शास्त्रानुसार विश्‍वकर्मा जातीच्या लोकांनी मूर्ती घडवली पाहिजे; म्हणून मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये. तसेच यासाठी अभियान चालवणार आहोत. राज्यातील सर्व देवळांना भेट देऊन अभियान राबवण्यात येणार आहे.

मुसलमान शास्त्रोक्त पद्धतीने मूर्ती घडवत नाहीत ! – श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी

श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी

मुसलमानांनी घडवलेली मूर्ती पूजेला योग्य नाही, असे श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजींनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मुसलमान शास्त्रोक्त पद्धतीने मूर्ती घडवत नाहीत; म्हणून मुसलमानांनी घडवलेली मूर्ती प्रतिष्ठापित करू नये. मुसलमान मूर्ती घडवतात, हे ठाऊक नव्हते.

मंदिराच्या दिवटीचे ‘सलाम’ ऐवजी  ‘संध्यारती’ असे नामकरण करावे ! – स्थानिकांची मागणी

दुसरीकडे चेलुवनारायणस्वामी मंदिराच्या दिवटीला ‘सलाम’ या नावाने ओळखले जाते आणि तिची आरती होते. ‘सलाम’ शब्द पालटावा म्हणून जिल्हा धार्मिक परिषदेने निवेदन दिले होते. ‘निवेदन पडताळून स्पष्ट अभिप्राय द्यावा’, अशी सूचना देण्यात आली होती. ‘सलाम शब्द काढून टाकण्यात यावा. ‘सलाम’ शब्द काढून ‘संध्यारती’ असा शब्द घालावा’, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

गंगावती (कर्नाटक) गावात ‘आमची वाटचाल हिंदूंच्या दुकानांकडे !’ या नावाचे अभियान !

कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती गावात ‘आमची वाटचाल हिंदूंच्या दुकानांकडे !’ अशा अभियानाचा सामाजिक माध्यमांतून प्रारंभ झाला आहे. ‘आवश्यक वस्तू हिंदूंकडूनच विकत घेऊया’, असा संदेश याद्वारे देण्यात येत आहे.