आरक्षण नसलेल्या समाजातील व्यक्तीशी विवाह केल्याने किंवा धर्मांतर केल्याने आरक्षणाचे लाभ समाप्त होत नाहीत ! – केरळ उच्च न्यायालय

कोची (केरळ) – धर्मांतर केल्यामुळे किंवा आरक्षणाचा लाभ नसलेल्या समाजातील व्यक्तीशी विवाह केल्याने आरक्षण समाप्त होत नाही. तसेच जर कोणत्याही आरक्षण घेत नसलेल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतल असलेल्या व्यक्तीला दत्तक घेतले, तरीही संबंधित दत्तक घेतलेली व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेऊ शकते, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.