डोंबिवली (ठाणे) येथील सुप्रसिद्ध तबलावादक आणि ‘संगीत (तबला) अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांनी केलेल्या तबलावादनाचे सूक्ष्मातील परीक्षण !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

२९.१२.२०२१ या दिवशी डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात तबलावादनाचे विविध प्रयोग सादर केले. आश्रमातील वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या काही साधकांवर ‘या तबलावादनाचा सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होता ?’, हे अभ्यासण्यासाठी प्रयोग करण्यात आले. देवाच्या कृपेने या प्रयोगांच्या वेळी श्री. सोवनी यांनी केलेले तबलावादन ऐकत असतांना मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

श्री. योगेश सोवनी

१. श्री. सोवनी यांनी तबल्यावर तीनतालमध्ये ‘पेशकार’ (टीप) हा प्रकार सादर केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

(टीप : पेशकार म्हणजे तबला एकलवादन करतांना वाजवले जाणारे तबल्यांचे बोलप्रकार.)

१ अ. श्री. सोवनी तबल्यावर ‘पेशकार’ हा तबल्यातील प्रकार वाजवत असतांना स्वर्गलोकातून कार्यक्रमस्थळी एक रागिणी येऊन तिने व्यासपिठाच्या भोवती सूक्ष्मातून नृत्य केल्याचे दिसणे आणि भाव जागृत होणे : जेव्हा श्री. सोवनी तबल्यावर ‘पेशकार’ हा तबल्यातील प्रकार वाजवत होते, तेव्हा एक निळसर पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण केलेली आणि लांबसडक वेणी असलेली एक रागिणी श्री. सोवनी बसलेल्या व्यासपिठाच्या भोवती नृत्य करत असल्याचे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. तेव्हा तिला पाहिल्यावर माझा भाव जागृत झाला आणि वातावरणात शीतलता जाणवली.

कु. मधुरा भोसले

१ आ. विविध घराण्यांच्या पद्धतीनुसार पेशकार तबलावादन करणे : श्री. सोवनी यांनी देहली, पंजाब, लखनऊ आणि फारुकाबाद या घराण्यांनुसार तबलावादन केले. श्री. सोवनी यांनी विविध घराण्यांच्या पेशकारांपैकी ‘लखनऊ’ घराण्यानुसार वाजवलेला पेशकार सर्वांत सात्त्विक असल्याचे जाणवले. विविध घराण्यांच्या पद्धतीचे तबलावादन केल्यावर त्यांच्यामध्ये पुढील भेद जाणवला.

१ आ १. पंजाब आणि फारुकाबाद या घराण्यांतील तबलावादनाशी संबंधित असणारी विविध सूत्रे

१ आ २. पंजाब आणि फारुकाबाद या घराण्यांतील तबलावादनाशी संबंधित असणार्‍या विविध घटकांचे प्रमाण

१ इ. श्री. सोवनी यांची सूर्यनाडी आणि चंद्रनाडी चालू झाल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे : पेशकार ऐकत असतांना श्री. सोवनी यांची सूर्यनाडी अधिक काळ चालू झाल्यामुळे त्यांच्याकडून उष्ण स्वरूपाची आल्हाददायक स्पंदने प्रक्षेपित झाली. श्री. सोवनी यांची काही वेळा चंद्रनाडी चालू होत होती. तेव्हा त्यांच्याकडून शीतल स्वरूपाची शांतीची स्पंदने प्रक्षेपित झाली. अशा प्रकारे श्री. सोवनी यांची सूर्यनाडी चालू असतांना मारक आणि चंद्रनाडी चालू असतांना तारक शक्तीच्या लहरी वायूमंडलात प्रक्षेपित झाल्या.

तबलावादन करतांना श्री. योगेश सोवनी

२. श्री. सोवनी यांनी तबल्यावर तीनतालमध्ये ‘कायदा’ (टीप १) हा प्रकार वाजवणे

(टीप १ :  हा तबला वादनातील स्वतंत्र मुख्य प्रकार आहे.)

२ अ. श्री. सोवनी यांनी ‘कायदा’ हा प्रकार त्रितालातून वाजवत असतांना त्यांनी मनात बोललेले तबल्याचे बोल त्यांच्या तबल्याच्या नादातून ऐकू येणे आणि श्रीरामाचा नामजपही ऐकू येणे  : जेव्हा ते ‘कायदा’ प्रकारातील तबलावादन करत होते, तेव्हा ते मनात म्हणत असलेले काही वेळा प्रत्यक्षातही म्हणतात. त्याला ‘पढंत’ म्हणतात. तबल्याच्या तालांचे बोल तबल्याच्या नादातून ऐकू आले. यावरून ‘त्यांचे मन तबल्याच्या नादाशी एकरूप झाले आहे’, असे जाणवले. त्याचप्रमाणे त्यांचे तबलावादन ऐकत असतांना मला प्रभु श्रीरामाचा नामजपही  २ – ३ वेळा ऐकू आला. यावरून ‘श्री. सोवनी किती भावपूर्णरित्या तबलावादन करत आहेत’, याची प्रचीती आली.

२ आ. श्री. सोवनी यांनी द्रुत लयीत तबला वाजवल्यावर तबल्याच्या नादातून अधिक प्रमाणात मारक शक्ती वातावरणात प्रक्षेपित होऊन वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे : जेव्हा ते मध्य लयीत तबलावादन करत होते, तेव्हा त्यांच्या तबल्यातून अल्प प्रमाणात मारक शक्ती प्रक्षेपित झाली. जेव्हा त्यांनी द्रुत लयीत तबला वाजवला, तेव्हा तबल्याच्या नादातून अधिक प्रमाणात मारक शक्ती वातावरणात प्रक्षेपित झाली. त्यामुळे प्रयोगाला उपस्थित असणार्‍या साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन सूक्ष्मातील त्रासदायक शक्ती बाहेर पडली.

२ इ. श्री. सोवनी यांचे मन आणि बुद्धी यांवर वाईट शक्तींनी त्रासदायक शक्तीचे आवरण आणल्यामुळे त्यांचे तबलावादन १ – २ वेळा चुकणे अन् त्यांनी त्यांच्या गुरूंची मनोमन क्षमा मागणे : श्री. सोवनी हे स्वतः सात्त्विक असल्यामुळे ‘त्यांच्याकडून सात्त्विक पद्धतीने तबलावादन होऊ नये’, यासाठी वाईट शक्ती त्यांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक शक्तीचे आवरण आणत होत्या. त्यामुळे तबलावादन करत असतांना त्यांना तबल्यातील बोलांचा विसर पडून तबलावादन १ – २ वेळा चुकले. तेव्हा त्यांच्या मुखावर चूक झाल्याची खंत जाणवत होती आणि त्यांनी त्यांच्या उजव्या हाताने उजव्या कानाला स्पर्श करून त्यांच्या गुरूंची मनोमन क्षमा मागितली.

३. तबल्यावर ‘पेशकार’ आणि ‘कायदा’ हे प्रकार वाजवल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

४. श्रीगुरुचरणी कृतज्ञता

श्रीगुरुकृपेमुळे मला संगीताचा काहीही गंध नसतांना श्री. सोवनी यांच्या तबलावादनाच्या प्रयोगांचे सूक्ष्मातील परीक्षण करण्याची सेवा करता आली आणि तबल्याच्या विविध प्रकारांचा सूक्ष्म स्तरावरील परिणाम अभ्यासता आला, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.