अन्वेेषण पोलीस अधिकारी सुषमा चव्हाण पुणे येथून मुंबई येथे आल्या !
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्यानंतर त्यातील पुरावे ‘पेनड्राईव्ह’च्या माध्यमातून विधानसभेच्या अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या पोलीस अधिकारी सुषमा चव्हाण यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावून घेतल्यानंतर त्या पुणे येथून मुंबई येथे आल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सुषमा चव्हाण यांनी पुणे येथून आणलेली सर्व कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. प्रारंभी सुषमा चव्हाण यांनी सकाळी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती त्यांना दिली. त्यानंतर सुषमा चव्हाण आणि संजय पांडे यांनी एकत्रितपणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.