अपहरणाच्या वेळी आतंकवाद्याने केली होती एका भारतीय प्रवाशाची हत्या
नवी देहली – जिहादी आतंकवाद्यांनी वर्ष १९९९ मध्ये ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेले होते. या आतंकवाद्यांपैकी जहूर मिस्त्री उपाख्य जाहिद अखुंद या आतंकवाद्याची कराची येथे हत्या करण्यात आली.
One of the five terrorists, who hijacked Indian Airlines plane IC-814 in 1999, has been killed in Pakistan’s Karachi by two unknown assailants https://t.co/PpcX9XblXt
— WION (@WIONews) March 8, 2022
अखुंद हा कराचीतील अख्तर कॉलोनीच्या आत ‘क्रिसेंट फर्निचर’ या दुकानाचा मालक होता. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली, हे स्पष्ट झालेले नाही. या विमान अपहरणाच्या वेळी अखुंद याने रूपिन कात्याल या एका भारतीय प्रवाशाची हत्या केली होती.