मिरज शासकीय रुग्णालय १० मार्चपासून सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी खुले ! – डॉ. सुधीर नणंदकर, अधिष्ठाता

मध्यभागी डॉ. सुधीर नणंदकर

मिरज – कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरली असल्याने १० मार्चपासून मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालय सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी खुले करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी केवळ दोन विभागांत ७० खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महाविद्यालयीन परीषद आणि कोरोना व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्यात आढावा घेऊन सामान्य रुग्णांसाठी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी ७ मार्च या दिवशी दिली.

डॉ. सुधीर नणंदकर पुढे म्हणाले, ‘‘आता विविध शस्त्रकर्म, औषधविभाग, अस्थिरोग, स्त्रीरोग, प्रसुती, तसेच बालरोग विभागासह बाह्यविभाग आणि अतीदक्षता विभागही पूर्ववत् होणार आहे. आंतररुग्ण विभाग सांगली शासकीय रुग्णालयात चालू राहील. १ एप्रिलअखेर कोरोनाबाधितांची संख्या पूर्णत: घटल्यास मिरज शासकीय रुग्णालय १०० टक्के क्षमतेने ‘नॉन कोविड रुग्णालय’ होईल.’’