रुग्णांना मूलभूत सुविधाही न पुरवणार्या रुग्णालयांबद्दल तक्रार कुठे करायची ? आरोग्य खाते झोपले आहे कि अधिकारी झोपले आहेत म्हणून असे होते ?
‘३ ते २३.४.२०२१ या कालावधीत मी पुणे येथे असतांना कोरोनामुळे रुग्णाईत होतो. त्या वेळी एकदा मी ‘वॉर्डबॉय’ला ‘बेडपॅन’ (मलविसर्जनाचे भांडे) मागितल्यावर त्याने मला तुटलेले ‘बेडपॅन’ दिले. मी त्याला सांगितले, ‘‘यावर बसले, तर त्याचे २ तुकडे होतील आणि मलाही लागेल.’’ तेव्हा त्याने मला दुसरे ‘बेडपॅन’ दिले. तेही थोडे तुटलेले होतेच; पण आधीपेक्षा बरे होते. काही वेळाने ‘वॉर्डबॉय’ने मला ‘तोंड धुवायचे आहे का ?’, असे विचारून तेच ‘बेडपॅन’ धुऊन त्यामध्ये पाणी आणून दिले. तेव्हा मी ‘नको’ म्हटले. त्या दिवसापासून घरी जाईपर्यंत मी दात घासलेच नाहीत; कारण ते त्याच ‘बेडपॅन’च्या भांड्यात पाणी आणून देत होते. मी माझ्याकडे असलेल्या ‘टिश्यू पेपर’ने तोंड आणि शरीर पुसत होतो. रुग्णांना मूत्रविसर्जन करण्यासाठी जे भांडे दिले जायचे, त्याला बुरशी आली होती. माझ्या मुलाच्या हे लक्षात आल्यावर त्याने मला औषधालयातून नवीन भांडे आणून दिले.
– श्री. प्रताप कापडिया (६४ टक्के आध्यात्मिक पातळी), फोंडा, गोवा. (८.५.२०२१)