विशिष्ट समाजातील महिलांवर घरातच वाईट दृष्टी ठेवली जात असल्याने त्यांनी घरातच हिजाब घालावा ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

उजवीकडे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – सार्वजनिक ठिकाणी कुणालाही हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) परिधान करण्याची आवश्यकता नाही. महिलांनी घरातच हिजाब घालावा. ज्या कुटुंबात आते, मावस आणि सावत्र बहिणीशी विवाह होतो, तेथे हिजाब वापरा. विशिष्ट समाजात मुली आणि बहिणी यांच्यावर घरातच वाईट दृष्टी ठेवली जाते. तेथे महिलांचा सन्मान केला जात नाही. या महिलांना त्यांचे काका, मामा, मामाची मुले आदींकडून धोका असतो. त्यामुळे त्यांना घरातच हिजाब घालण्याची आवश्यकता आहे. हिजाब केवळ मदरशापर्यंतच मर्यादित ठेवला पाहिजे. विद्यालय-महाविद्यालय यांचे नियम मोडल्यास सहन केले जाणार नाही, असे विधान भाजपच्या येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुढे म्हणाल्या, ‘‘आमच्या सनातन धर्मात नारीपूजा होते.  हिंदु धर्मात महिलेला देवीस्वरूप मानले आहे. त्यामुळे हिंदु महिला सुरक्षित असतात. आम्हाला हिजाबची आवश्यकता नाही. हिंदू सनातनी परंपरा मानतात. हिंदु विद्यार्थी गुरुकुलमध्ये भगवी वस्त्रे घालून जातात; पण शाळा आणि महाविद्यालये येथे ते गणवेशच घालतात.’’