१. एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब (इंग्रजी)
एस्.एस्.आर्.एफ्.ची ‘पोस्ट’ वाचून मला साधना करण्याची प्रेरणा मिळाली ! : ‘फेथ मीन्स बिलीफ (श्रद्धा म्हणजे विश्वास)’ ही तुमची ‘पोस्ट’ मला पुष्कळ आवडली. ही ‘पोस्ट’ वाचून मला साधना करण्याची प्रेरणा मिळाली. या ‘पोस्ट’मुळे मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. गुरूंच्या चरणी कृतज्ञता !’
– स्वाती पी.
२. एस्.एस्.आर्.एफ्. रशियन व्हिकॉन्टॅक्टी (रशियन व्हिकॉन्टॅक्टी (रशियाचे एक सामाजिक माध्यम))
एस्.एस्.आर्.एफ्.मुळे माझ्या बर्याच शंकांचे निरसन झाले आहे ! : ‘तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नामजप करत आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद ! माझ्या बर्याच शंकांचे निरसन झाले आहे, तसेच माझी साधना करण्याची इच्छा वाढली आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करून साधनेत साहाय्य करत आहे’, ही पुष्कळच चांगली गोष्ट आहे.’ – एक जिज्ञासू, रशिया
३. एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम
एस्.एस्.आर्.एफ्. सांगत असलेली साधना सध्याच्या काळात करता येण्यासारखी आहे ! : ‘मी एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूबवरील चलचित्र पहाते. तुम्ही जी साधना सांगत आहात, ती सध्याच्या काळात करता येण्यासारखी आहे. मला साधनेत मार्गदर्शन केल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्याप्रती कृतज्ञ आहे.’ – श्रीमती प्रणाली शैलेश
४. एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट
‘अध्यात्मावर आधारित माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेत आहात, त्यासाठी तुमचे पुष्कळ आभार ! तुम्ही देत असलेले हे ज्ञान वाचण्यास आणि दैनंदिन जीवनात ते कृतीत आणण्यास मी उत्सुक आहे.’ – एक जिज्ञासू , मलेशिया
एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट
१. मीठ-पाण्याचे उपाय केल्यावर आणि गायत्री मंत्र म्हटल्याने त्रास उणावणे : ‘माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मला कधी कधी नकारात्मकता जाणवते. त्या वेळी मी तुम्ही मार्गदर्शन केल्यानुसार मीठ-पाण्याचे उपाय करतो, तसेच गायत्री मंत्र म्हणतो. हे दोन्ही उपाय केल्यावर माझा त्रास हळूहळू उणावत आहे.’ – एक जिज्ञासू, मलेशिया
२. नामजप करण्यास आरंभ केल्यापासून राग येण्याचे प्रमाण न्यून होणे : ‘गेल्या तीन मासांपासून मी नामजप करण्यास आरंभ केला आहे. २ मासांपासून मला राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. हे साध्य करण्यास मला बराच कालावधी लागला; मात्र चिकाटीने प्रयत्न करून नामजपाच्या साहाय्याने ते मला साध्य करता आले.’ – एक जिज्ञासू, फ्रान्स (डिसेंबर २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |