देशाची स्थिती सुधारण्यासाठी आता केवळ साधकांचे राज्य आवश्यक !

परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सरकारी कर्मचारी हे देशाची सेवा करण्यासाठी असतात. असे असले, तरी त्यांना पगार असतोच. त्यांना त्यांचा पगार अल्प वाटू लागला की, त्यांची लगेच आंदोलने आणि संप चालू होतात. काम करतांनाही त्यामध्ये कामचुकारपणा आणि भ्रष्टाचार असतो, तो निराळाच ! त्यामुळे ‘सध्याच्या काळात देशासाठी कुणी सरकारी कर्मचारी बिनपगारी नोकरी करील का ?’, असा प्रश्न हास्यास्पद ठरतो.

याउलट राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्‍या आश्रमांमध्ये कुणीही पगार घेत नाही. ते ‘तन, मन आणि धन अधिकाधिक कसे अर्पण करू शकतो ?’, याचा विचार करतात. त्यातून त्यांना लौकिकदृष्ट्या काहीही लाभ होणार नसला, तरी ते करत असलेल्या सेवांमध्ये कुठेही भ्रष्टाचार किंवा कामचुकवेगिरी नसते. उलट ‘गुरूंचे पैसे कसे वाचवू शकतो ? करत असलेली सेवा लवकर आणि परिपूर्ण कशी करू शकतात ?’, याचा विचार ते अधिक करतात. साधकांची ही गुणवैशिष्ट्ये बघितल्यावर ‘अधोगतीला गेलेल्या देशाला वर आणण्यासाठी आता देशावर साधकांचेच राज्य आणणे’, हाच एकमेव पर्याय दिसतो !’