बुरखा म्हणजे ‘ओव्हन’ असल्याने मला तो घालायचा नाही  !  

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे समर्थन करणार्‍या नोबल पारितोषिक प्राप्त मलाला युसूफझाई हिचे बुरख्याविषयीचे मत

सोयीप्रमाणे हिजाब आणि बुरखा यांविषयी मते मांडणार्‍या दुटप्पी मलाला युसूफझाई हिला मिळालेले नोबल पारिताषिक परत घेण्याची मागणी भारताने केली पाहिजे !

(टीप : ‘ओव्हन’ म्हणजे खाद्यपदार्थ भाजण्याचे एक यंत्र)

नवी देहली – काही वर्षांपूर्वी अफगानिस्तानमधील तालिबान्यांच्या गोळीबारात घायाळ झालेली आणि शांततेसाठी नोबल पारितोषिक प्राप्त झालेली अफगाणिस्तानमधील तरुणी मलाला युसफझाई हिने कर्नाटकातील हिजाब प्रकरणात मुसलमान मुलींच्या मागणीचे समर्थन केले. त्यामुळे तिला आता सामाजिक माध्यमांतून विरोध होत आहे. मलाला हिने लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ यासाठी दिला जात आहे. या पुस्तकात मलालाने बुरख्याविषयी म्हटले आहे, ‘इस्लामी कट्टरतावादी महिलांना बुरखा घालण्यासाठी बाध्य करतात. बुरखा घालणे, म्हणजे एका मोठ्या कपड्यामध्ये ‘शटलकॉक (बॅडमिंटनमध्ये वापरण्यात येणारी वस्तू) सारखे आहे. या बुरख्यामध्ये केवळ एक लहान जाळी आहे आणि उन्हाळ्याच्या दिवशी बुरखा ‘ओव्हन’सारखे (खाद्यपदार्थ भाजण्याचे एक यंत्र) आहे. मला तो घालायचा नाही.’

मलाला जेव्हा ब्रिटनमधील महाविद्यालयात शिकत होती, तेव्हा तिने कधीही हिजाब किंवा बुरखा घातला नव्हता, असेही समोर आले आहे.