आत्महत्येच्या चौकशीत बाल अधिकार संरक्षण आयोगाला सहकार्य करण्यास तमिळनाडूच्या द्रमुक सरकारचा नकार !

कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण

ख्रिस्तीप्रेमी आणि हिंदुद्वेषी द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकार कधीतरी हिंदूंना साहाय्य करून ख्रिस्ती मिशनर्‍यांचा विरोध करील का ? ‘या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सीबीआय चौकशी केली पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील तंजावूरमधील मायकलपट्ट येथील ‘सेक्रेड हार्ट’ या उच्च माध्यमिक शाळेमधील १२ वीची विद्यार्थिनी लावण्या हिचा धर्मांतरासाठी छळ करण्यात आला. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. याविषयी आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग चौकशी करणार आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रियंक कानूनगो यांनी दिली आहे. स्वतः कानूनगो ३० जानेवारीला तंजावूरला जाणार आहेत. या चौकशीमध्ये सहकार्य करण्याची तमिळनाडू सरकारला केलेली विनंती सरकारने अमान्य केल्याचे आयोगाने सांगितले आहे. दुसरीकडे भाजपने या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात् सीबीआयने करावी, अशी मागणी केली आहे.

१. आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, या प्रकरणी तमिळनाडू सरकारकडे चौकशी करण्यास साहाय्य करण्याची विनंती केली होती; मात्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत साहाय्य करण्यास नकार दिला आहे. तरीही आमचे पथक तमिळनाडूमध्ये चौकशीसाठी जाणार आहे. तसेच ‘पोलीस अधीक्षक आणि चौकशी अधिकारी यांनी त्या वेळी उपस्थित रहावे’, असे सांगितले आहे.

२. आयोगाने या प्रकरणी तमिळनाडू सरकारकडेही स्पष्टीकरण मागितले आहे. कानूनगो यांनी सांगितले की, राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस पाठवून याविषयी अहवाल सादर करण्याचा आदेश २१ जानेवारी या दिवशी देण्यात आला आहे; मात्र महासंचालकांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. (यातून राज्याचे पोलीस महासंचालक कायदाद्रोह करून एका हिंदु मुलीच्या खुन्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न करत आहेत. याविषयीही केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करून मृत हिंदू मुलीच्या नातेवाइकांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे ! – संपादक)