पुणे – शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘सुपर स्प्रेडर’ रुग्णांना शोधण्यासाठी महापालिकेने ‘रॅपिड अँटीजेन’ चाचणी करण्याची मोहीम चालू केली आहे.
पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच असल्याने बाधितांची संख्या रोखण्यासाठी ‘सुपरस्प्रेडर’ची कोरोना तपासणी केली जाणार आहे.#Rapidantigentesting #spot #Superspreader #pune #coronavirus https://t.co/w373VzPApK
— SakalMedia (@SakalMediaNews) January 6, 2022
महापालिकेच्या प्रत्येक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पथारी व्यावसायिक, भाजीविक्रेते, दुकानदार, दुकानातील कर्मचारी, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी जाऊन ‘रॅपिड अँटीजेन’ चाचणी करण्यासाठी पथके सिद्ध करण्याच्या सूचना १५ क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. एका क्षेत्रीय कार्यालयाने प्रतिदिन कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त कितीही नागरिकांच्या चाचण्या कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.