‘६.१२.२०२१ या दिवशी झालेल्या एका भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सनातनचे साधक पू. लक्ष्मण गोरेकाका हे ‘संत’ झाल्याचे घोषित केले. त्यावेळी देवाच्या कृपेमुळे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. सत्संग आरंभ होण्यापूर्वी झालेले सूक्ष्म परीक्षण
अ. वातावरणात ५० टक्के दाब आणि निरुत्साह जाणवत होता.
आ. सत्संगाच्या ठिकाणी अल्प प्रमाणात चैतन्य कार्यरत होते.
२. कु. तेजल पात्रीकर यांनी सत्संगाच्या आरंभी श्रीकृष्णाचा नामजप ऐकण्याचा प्रयोग घेणे
जेव्हा कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी सत्संगाचे सूत्रसंचालन आरंभ केले, तेव्हा वातावरणात थोड्या प्रमाणात चैतन्य कार्यरत झाले. त्यानंतर त्यांनी ‘श्रीकृष्णाचा नामजप ऐकून काय जाणवते ?’, हा सूक्ष्म प्रयोग करण्यास सांगितला. तेव्हा श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप सर्वांना ध्वनीवर्धकावर ऐकवण्यात आला. तेव्हा सर्व साधकांना विविध प्रकारच्या अनुभूती आल्या आणि नामजपाच्या माध्यमातून वातावरणात श्रीकृष्णाचे तत्त्व कार्यरत असल्याचे जाणवले आणि वातावरणातील दाब १० टक्के न्यून झाला.
३. कु. तेजल पात्रीकर यांनी सत्संगाच्या पुढील सत्रात पांढर्या लखोट्याकडे पहाण्याचा सूक्ष्म प्रयोग करून घेणे
‘व्यासपिठावर ठेवलेल्या एका पांढर्या रंगाच्या लखोट्याकडे पाहून काय जाणवते ?’, याचा प्रयोग करण्यात. तेव्हा त्या लखोट्याकडे पाहिल्यावर तेथे एक चैतन्यदायी पोकळी असल्याचे जाणवले. या पोकळीमुळे कार्यक्रमाला उपस्थित असणारे संत आणि साधक यांचे लक्ष कागदाकडे केंद्रित झाले. या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला प्रभु श्रीरामाचे स्मरण झाले आणि श्री दुर्गादेवीची शक्ती कार्यरत असल्याचे जाणवले. तसेच ‘हे एका संतांचे छायाचित्र आहे’, असे मला जाणवले. तसेच या चित्रावर सूक्ष्मातून अनेक वाईट शक्ती आक्रमणे करत असल्याचे जाणवले; परंतु या चित्रातून श्री दुर्गादेवीची मारक शक्ती आणि क्षात्रतेज वातावरणात प्रक्षेपित होऊन वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याचे जाणवले. त्यामुळे या वाईट शक्ती दूर निघून गेल्या आणि वातावरणातील दाब १० टक्के न्यून झाला. (भावसत्संगानंतर मला जेव्हा पू. गोरेकाका यांचे जावई श्री. वैभव आफळे भेटले, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांना आदल्या दिवसापासून सूक्ष्मातून युद्ध चालू आहे, असे जाणवले. त्यांना त्यांच्या पाठीपासून खालपर्यंत वेदना जाणवू लागल्या. – कु. मधुरा)
४. कु. तेजल पात्रीकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सत्संगाच्या ठिकाणी सूक्ष्मातून आगमन झाल्याचा भावप्रयोग घेणे
जेव्हा कु. तेजल पात्रीकर वरील भावप्रयोग घेत होत्या, तेव्हा सत्संगाच्या ठिकाणी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शुभागमन झाल्याचे मला जाणवले. त्यामुळे भावसत्संगाला उपस्थित असणार्या अनेक साधकांचा भाव जागृत होऊन तो अश्रुधारांच्या रूपाने त्यांच्या डोळ्यांतून वाहू लागला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सूक्ष्म रूपातून प्रक्षेपित झालेल्या निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्यामुळे वातावरणातील उर्वरित दाबापैकी १० टक्के दाब न्यून झाला.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. गोरेकाका यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया
जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. गोरेकाका यांना व्यासपिठावर बोलवले. त्यानंतर लखोट्यातील वस्तू बाहेर काढली, तेव्हा ते पू. गोरेकाका यांचे छायाचित्र असल्याचे समजले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. गोरेकाका यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. तेव्हा पू. गोरेकाकांचे छायाचित्र आणि पू. गोरेकाका यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य अन् आनंद वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. तेव्हा वातावरणात चंदेरी, रूपेरी आणि मोरपिशी रंगांचे अनेक दैवी कण वातावरणात चमकतांना दिसले. त्यामुळे वातावरणातील उर्वरित २० टक्के दाब निघून गेला आणि संपूर्ण वातावरणात चैतन्य अन् आनंद यांची स्पंदने पसरली.
६. प्रभू श्रीराम आणि श्रीदुर्गादेवी यांनी पू. गोरेकाका यांचा सूक्ष्मातून सन्मान केल्याचे जाणवणे
सनातनचे सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी पू. गोरेकाका यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. तेव्हा सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या ठिकाणी प्रथम प्रभु श्रीराम आणि नंतर श्री दुर्गादेवी यांनी पू. गोरेकाका यांचा सन्मान केल्याचे जाणवले. सूक्ष्म परीक्षण करतांना मला असे जाणवले की, पू. गोरेकाका यांच्यामध्ये हनुमानाप्रमाणे दास्यभाव आहे. त्यामुळे प्रभु श्रीरामानेच त्यांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे त्यांनी निरपेक्षभावाने देशसेवा केल्यामुळे राष्ट्रशक्तीचे मूर्तीमंत रूप असणार्या श्री दुर्गादेवीने त्यांचा सन्मान केल्याचे जाणवले.
७. पू. गोरेकाका यांच्याभोवती श्रीदुर्गादेवीच्या मारक शक्तीचे लालसर रंगाचे संरक्षककवच कार्यरत असल्याचे जाणवणे
पू. गोरेकाका यांच्यामध्ये मला श्री दुर्गादेवीची मारक शक्ती आणि क्षात्रतेज सामावलेले जाणवले. तसेच त्यांच्याभोवती श्री दुर्गादेवीच्या मारक शक्तीचे लालसर रंगाचे संरक्षककवच कार्यरत असल्याचे जाणवले. (याविषयी श्री. वैभव आफळे यांनी भावसत्संगानंतर मला सांगितले की, पू. गोरेकाका यांचा जन्म नवरात्रीत झाल्यामुळे तुला त्यांच्याभोवती देवीच्या शक्तीचे संरक्षककवच असल्याचे जाणवले.- कु. मधुरा)
८. पू. गोरेकाका यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
८ अ. पू. गोरेकाकांमध्ये श्री हनुमानाप्रमाणे दास्यभाव आणि बालकांप्रमाणे बालकभाव आहेत.
८ आ. पू. गोरेकाका सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणे : पू. गोरेकाका यांचा अहं न्यून असल्यामुळे त्यांच्यामध्ये सतत बालकभाव जागृत असतो आणि ते ईश्वराच्या अखंड अनुसंधानात असतात.
८ इ. पू. गोरेकाकांकडून वातावरणात क्षात्रतेजाची केशरी रंगाची स्पंदने प्रक्षेपित होणे : पू. गोरेकाकांमध्ये धर्मप्रेम आणि धर्माभिमान पुष्कळ प्रमाणात आहे. त्याच प्रमाणे त्यांच्यामध्ये धर्मरक्षण करण्याची तीव्र तळमळ असून त्यांच्यामध्ये क्षात्रवृत्ती सतत जागृत असते. त्यामुळे त्यांच्याकडून वातावरणात क्षात्रतेजाची केशरी रंगाची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात.
८ ई. पू. गोरेकाका अखंड भावावस्थेत आणि ध्यानावस्थेत असणे : पू. गोरेकाका अखंड भावावस्थेत असण्यासह अखंड ध्यानावस्थेतही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्यातील भावावस्थेमुळे साधकांना आनंद जाणवतो आणि ध्यानावस्थेमुळे साधकांचे मन निर्विचार होते किंवा साधकांचा निर्विचार किंवा निर्गुण हा नामजप चालू होतो.
८ उ. पू. गोरेकाकांची कर्मयोग आणि भक्तीयोग यांनुसार साधना झालेली असणे : पू. गोरेकाकांनी राष्ट्राभिमान बाळगून निरपेक्षभावाने देशसेवा केली. त्यामुळे त्यांची कर्मयोगामुळे साधना झाली. त्यांचा संपर्क जेव्हा सनातन संस्थेशी आला, तेव्हा त्यांची भक्तीयोगानुसार साधना चालू झाली. त्यामुळे त्यांच्यामध्ये ईश्वराप्रतीचा भक्तीभाव जागृत झाला.
८ ऊ. पू. गोरेकाका यांना हिंदु राष्ट्र लवकरात लवकर स्थापन होण्याचा ध्यास लागलेला असणे : पू. गोरेकाका यांना हिंदु राष्ट्र लवकरात लवकर स्थापन होण्याचा ध्यास लागलेला आहे. त्यामुळे ते सतत ईश्वराला पृथ्वीवर लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी प्रार्थना करत असतात. ‘त्यांच्यासारख्या भक्तामुळेच ईश्वर पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करणार आहे’, असे मला जाणवले. (याविषयी भावसत्संगानंतर सौ. गौरी आफळे म्हणाल्या की, पू. गोरेकाकांना पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन होण्याचा ध्यास लागलेला आहे आणि ते सतत तशी प्रार्थना देवाला करत असतात. – कु. मधुरा)
८ ए. पू. गोरेकाका यांच्यातील विविध घटकांचे प्रमाण
कृतज्ञता : मला भगवंताच्या कृपेने पू. गोरेकाका यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित रहाण्याची आणि त्यांच्यातील संतत्व अन् गुण अनुभवण्याची संधी मिळाली. यासाठी मी भगवंताच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन
|