पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

ख्रिस्त्यांनी हिंदूंवर ३५० वर्षे अत्याचार केल्याच्या पार्श्‍वभूमीवर केली मागणी !

विहिंपवर ही मागणी करण्याची वेळ येऊ नये. केंद्र सरकारने स्वतःचे हे सूत्र लावून धरले पाहिजे ! – संपादक

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस

कर्णावती (गुजरात) – मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्‍व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर विहिंपने ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस भारताच्या दौर्‍यावर येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, ‘ख्रिस्त्यांनी हिंदूंवर गेल्या ३५० वर्षांत केलेल्या अत्याचारांसाठी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे. तसेच ‘भारतात हिंदूंचे धर्मांतर करणार नाही’, अशी घोषणाही त्यांनी करावी, अशी मागणी केली आहे. विहिंपच्या संमेलनामध्ये विविध हिंदु संघटना, धर्माचार्य आदी सहभागी होणार आहेत. वर्ष २०२४ मध्ये विहिंपला ६० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या अनुषंगाने संमेलनामध्ये विहिंपच्या विस्तारावरही चर्चा केली जाणार आहे.